रविवारी भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी तामिळनाडूचा दौरा केला. यावेळी त्यांनी द्रविड मुनेत्र कणगम (DMK) वर जोरदार निशाणा साधला. द्रमुक हा पक्ष हिंदू विरोधी असून आपल्याला एनके स्टॅलिन यांच्या पक्षाचा पराभव करायला हवा. भाजपचं असा पक्ष आहे जो भारतातील सर्व भाषांचा सन्मान करतो आणि त्यांना चालनाही देतो असं ते म्हणाले."द्रमुक या ठिकाणी अतिशय वाईट आणि धोकादायक विचारधारेचं प्रतिनिधीत्व करते. त्यांची विचारधारा हिंदू विरोधी आहे. प्रत्येक तमिळ व्यक्ती हा हिंदू आहे. ही अशी पवित्र भूमी आहे ज्या ठिकाणी देशातील सर्वाधिक मंदिरं आहेत. तमिळनाडूची इंच न इंच जमिन ही पवित्र आहे. परंतु द्रमुक हा हिंदू विरोधी पक्ष आहे. आपल्याला त्यांचा पराभव करावाच लागेल," असं तेजस्वी सूर्या एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले.
DMK हिंदूविरोधी पक्ष, तमिळ भाषेला वाचवायचं असेल तर हिंदुत्व आणलं पाहिजे : तेजस्वी सूर्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 14:21 IST
Tejasvi Surya In Tamil Nadu : भाजपला प्रत्येक स्थानिक भाषांचा आदर, तमिळ भाषा वाचवायची असल्यास हिंदुत्वाला जिंकावं लागेल, सूर्या यांचं वक्तव्य
DMK हिंदूविरोधी पक्ष, तमिळ भाषेला वाचवायचं असेल तर हिंदुत्व आणलं पाहिजे : तेजस्वी सूर्या
ठळक मुद्देभाजपला प्रत्येक स्थानिक भाषांचा आदर : तेजस्वी सूर्यातमिळ भाषा वाचवायची असल्यास हिंदुत्वाला जिंकावं लागेल, सूर्या यांचं वक्तव्य