शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकारिणीत डावलल्यानं राष्ट्रवादीमध्ये नाराजी; कार्यकर्ते घेणार प्रदेशाध्यक्षांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 01:00 IST

जिल्हाध्यक्ष व माजी आ. जगन्नाथ शिंदे व कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

कल्याण :  राष्ट्रवादीची कल्याण-डोंबिवली जिल्हा कार्यकारिणी मंगळवारी जाहीर झाली. मात्र, या जम्बो कार्यकारिणीत डावलल्याने कार्यकर्त्यांमधील नाराजी उफाळून आली आहे. पडत्या काळात पक्षात इमानेइतबारे काम करूनही न्याय मिळत नसल्याची खंत ते व्यक्त करीत असून काहींनी तर थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे गाऱ्हाणे मांडण्याची तयारी केली आहे. 

जिल्हाध्यक्ष व माजी आ. जगन्नाथ शिंदे व कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्षपदी २५, सरचिटणीसपदावर १३ जणांची नियुक्ती केली आहे. तर विधानसभानिहाय अध्यक्ष आणि कार्याध्यक्षही जाहीर केले. मंगळवारी पदे जाहीर होताना काहींनी स्थानिक पातळीवर काम न करता प्रदेश पातळीवर काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे दिसून आले. तर काही जणांनी नाराजीमुळे नियुक्तिपत्रकेच घेतली नाहीत. डोंबिवलीतील कार्यकर्ते भाऊ पाटील यांना अध्यक्षपद न मिळाल्याने त्यांचीही नाराजी पद वाटपावेळी दिसून आली.  कार्यकारिणी बनवताना स्थानिकांना विश्वासात घेतले गेलेले नाही, पक्षविरोधी काम केलेल्यांना पदे वाटली आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करून काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीविरोधात काहींनी निवडणूक लढविली होती. त्यांनाही पदे वाटल्याकडे कल्याणमधील नाराज कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले आहे.  

अध्यक्षपद न मिळालेले डोंबिवलीतील कार्यकर्ते भाऊ पाटील हे गुरुवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेणार आहेत. डोंबिवलीतील कार्यकर्तेही नाराज असून तेही त्यांची व्यथा वरिष्ठ पातळीवर मांडणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. कल्याण ग्रामीणमधील कार्यकर्ते ॲड. ब्रह्मा माळी यांनीदेखील ग्रामीणचे अध्यक्षपद मिळावे म्हणून स्थानिक नेत्यांकडे इच्छा व्यक्त केली होती. परंतु, त्यांनाही डावलल्याने ते संबंधित नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस