शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मावळ निवडणुकीत अपक्ष उमेदवारांच्या मतदानात घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 00:03 IST

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये २००९ मध्ये तेरा अपक्ष निवडणूक रिंगणात होते.

- योगेश्वर माडगूळकर मुंबई : मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये २००९ मध्ये तेरा अपक्ष निवडणूक रिंगणात होते. तर २०१४ मध्ये अपक्षाच्या संख्येत घट झाली आहे. त्यांची संख्या ११ होती. यंदाच्या निवडणुकीत ती संख्या कायम आहे. तसेच अपक्षांना मिळालेल्या मतामध्ये सुमारे दहा हजार मतांची घट झाली आहे. २००९मध्ये अपक्षांना ४५०८२ मते मिळाली होती. तर २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ३५२८६ मते मिळाली होती.२०१४ मध्ये प्रमुख उमेदवारांच्या नावामध्ये साधार्म्य असणारे तीन उमेदवार रिंगणात होते. २००९ मध्ये असा कोणाताही फॉर्म्युला वापरण्यात आला नव्हता. २०१९ च्या निवडणुकीत नावात साधार्म्य असणारे उमेदवार नाहीत. परंतु २०१४ आणि २०१९ मध्ये असणाऱ्या उमेदवारांची संख्या सारखी आहे. हाच केवळ योगायोग आहे. विशेष म्हणजे, तीनही निवडणुकीत एक ही अपक्ष स्व:ताचे डिपॉझिट राखू शकला नाही. तिन्ही निवडणुकीत अपक्षांना त्यांचे डिपॉझिट गमवावे लागले आहे.२००९ मध्ये निवडणुकीत तेरा अपक्ष रिंगणात होते. त्यापैकी एक अपक्ष उमेदवार हजार मतांचा टप्पा ओलांडू शकला नाही. २०१४ मध्ये ११ अपक्षांनी एक हजार मतांचा टप्पा ओलांडला होता. २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक ८७६० मते एका अपक्ष उमेदवाराला पडली होती. एकूण झालेल्या मतदानापैकी शेकडा प्रमाण १.२२ टक्के होते. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत एका अपक्षाला ८७६५ मते मिळाली होती. ती मते एकूण झालेल्या मतदानापैकी ०.७५ टक्के इतके आहे. विशेष म्हणजे, दोन्ही निवडणुकीत नोटा मतदान जास्त झाले होते. यंदाच्या निवडणुकीत ही गत पंचवार्षिकसारखी आहे. हा केवळ योगायोग म्हणाला लागेल.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019maval-pcमावळ