शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेले धनंजय मुंडे पोहोचले शरद पवारांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 17:22 IST

सिल्व्हर ओकवर जाऊन घेतली शरद पवारांची भेट

मुंबई: गायक तरुणीनं बलात्काराचे आरोप केल्यानं संकटात सापडलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. मुंडे यांनी शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याच बराच वेळ चर्चा झाल्याचं समजतं.धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांची भेटून आपली भूमिका त्यांच्यासमोर मांडली. त्याआधी त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून स्वत:ची भूमिका जनतेसमोर ठेवली होती. त्यांच्या फेसबुक पोस्टनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत होते. त्यानंतर आज मुंडे यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांच्यासोबत याबद्दल सविस्तर चर्चा करून त्यांची भूमिका स्पष्ट केली.'धनंजय मुंडेंनी दुसऱ्या विवाहाची माहिती लपवली'; भाजप नेत्याची निवडणूक आयोगाकडे लेखी तक्राररेणू शर्मा या गायक तरुणीने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले आहेत. शर्मा यांनी पोलीस तक्रारीची कॉपीही ट्विट केली. त्यानंतर धनंजय मुंडे यांना खुलासा करावा लागला. रेणू शर्मा मला पैशाच्या कारणास्तव ब्लॅकमेलिंग करत आहेत. माझे रेणू यांची बहिण करुणा शर्मा यांच्याशी परस्पर सहमतीने संबंध आहेत. तसंच या संबंधातून आम्हाला दोन मुलंही आहेत. त्यांची जबाबदारीदेखील मी घेतली आहे, असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलं.धनंजय मुंडे प्रकरणी भाजपानं सोडलं मौन; “गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री राजीनामा देतील वाटत नाही,पण...”माझ्या जवळच्या लोकांना आमच्या संबंधांबद्दल माहिती आहेत. तसंच कुटुंबालाही या सगळ्याची कल्पना आहे, असं मुंडेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे शरद पवारांनादेखील याची माहिती असं म्हटलं जातं आहे. अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडेंना पवारांनी नेमका कोणता सल्ला दिला याची माहिती अद्याप तरी उपलब्ध झालेली नाही. मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणात शरद पवार नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेSharad Pawarशरद पवारRapeबलात्कार