शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत कपात, गिरीश बापट म्हणतात..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 17:03 IST

BJP News : देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना सरकारच्या संरक्षणाची गरज नाही. भाजप कार्यकर्त्यांच्याच संरक्षणाचीच फौज सक्षम आहे

सातारा - सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला किंवा त्यांची पकड आहे हे मला मान्य नाही. आम्हीही ग्रामपंचायत निवडणुकीत ताकदीने उतरलो आहे, असा दावाच खा. गिरीश बापट यांनी केला. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना सरकारच्या संरक्षणाची गरज नाही. भाजप कार्यकर्त्यांच्याच संरक्षणाचीच फौज सक्षम आहे असेही ठामपणे त्यांनी सांगितले.सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर खा. गिरीश बापट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने ते दौऱ्यावर आले होते. यावेळी ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.खा. बापट म्हणाले, महात्मा गांधींचा खेड्याकडे चला हा विचार केंद्र शासनाने अमलात आणला आहे. खेडोपाड्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सुरू आहे. खेड्यातील स्वयंरोजगाराला चालना देण्यात येत आहे. ह्यमनरेगाह्णसारख्या योजना सुरू आहेत. हे सर्व कोणामुळे होत आहे हे लोकांनाही माहीत आहे. याचा बेस आमच्या पाठीमागे आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत याचा फायदा भाजपला नक्कीच होईल. तसेच भाजपचे संघटन वाढून पक्षाला बळही मिळेल.सातारा जिल्ह्याचे प्रश्न माहीत आहेत. राजकारण कसे चालते याचीही माहिती आहे. भाजपच्या संघटनासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे सांगून खा. बापट पुढे म्हणाले, जिल्ह्यातील ५५५ ग्रामपंचायतींच्या ठिकाणी भाजपने कमी-अधिक फरकाने पॅनल उभे केले आहे. तीन हजार कार्यकर्ते निवडणूक रिंगणात आहेत. प्राथमिक अंदाजानुसार भाजपचे अडीच हजार कार्यकर्ते निवडून येतील.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व इतर काही नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली असल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केल्यावर खा. गिरीश बापट म्हणाले, अभ्यास करून एखाद्या नेत्याच्या बंदोबस्तात फरक होतो. याचा अर्थ दुर्लक्ष होत आहे, असा होत नाही. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याबाबतही असे झाले. यामध्ये राजकीय आकस आहे, असे मला वाटत नाही. तरीही भाजपचे व विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सरकारच्या संरक्षणाची गरज नाही. भाजप कार्यकर्त्यांची फौज संरक्षणासाठी सक्षम आहे.सदिच्छा भेटीत उदयनराजेंशी गळा भेट... खा. गिरीश बापट सातारा जिल्हा दौऱ्यावर होते. साताऱ्यात आल्यावर प्रथम त्यांनी जलमंदिर येथे जाऊन खा. उदयनराजे भोसले यांची गळाभेट घेतली. तर खा. बापट यांनी पत्रकारांशी बोलताना उदयनराजेंवर स्तुतिसुमने उधळली. उदयनराजे आणि सर्व कुटुंबीय हे माझे आदर्श आहेत. मी नेहमीच जलमंदिरात भेटायला येत असतो. ही सदिच्छा भेट आहे. सामान्य माणसांशी नाळ आणि त्यांच्यावरील प्रेम हे त्यांचे गुण आहेत. या गुणांमुळे उदयनराजे हे माझे एकदम जवळचे मित्र आहेत, असेही यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसgirish bapatगिरीष बापट