शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

अजित पवार यांनी दिलेल्या आव्हानाला देवेंद्र फडणवीसांचे प्रतिआव्हान, म्हणाले...

By बाळकृष्ण परब | Updated: March 1, 2021 13:05 IST

Devendra Fadnavis's response to the challenge given by Ajit Pawar : आजपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विविध विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

मुंबई - आजपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विविध विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदावरूनही सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर काल अजित पवार यांनी विरोधकांना अविश्वास प्रस्ताव आणून दाखवा आम्ही तो वाजवून दाखवू असे आव्हान दिले होते. त्यानंतर अजित पवारांच्या (Ajit Pawar) या आव्हानाला विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिआव्हान दिले आहे. (Devendra Fadnavis's response to the challenge given by Ajit Pawar ) 

फडणवीस म्हणाले की, विधिमंडळाच्या कामकाजाबाबत घटनेनं जी जबाबदारी दिली आहे ती झटकायचे काम राज्य सरकारकडून सुरू आहे. राज्यपालांनी नियमानुसार अध्यक्षपदाची निवडणूक घ्या असा सल्ला दिला होता. मात्र राज्य सरकारने तो ऐकलेला नाही. दरम्यान, काल अजित पवार यांनी केलेल्या विधानावरून अजित पवार यांच्या मनातली भीती दिसून आली. अजित पवार यांना अध्यक्षाच्या निवडणुकीत त्यांचेच आमदार, मंत्री विरोधात मदत करतील, अशी भीती वाटतेय, असा टोला फडणवीस यांनी लगावला. तसेच अजित पवार यांनी काल केलेल्या विधानाला काही अर्थ नाही, अशी टीकाही त्यांनी केली.  

काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हे पद रिक्त आहे, नाना पटोले यांच्यावर काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदारांना सभागृहात उपस्थित राहणे, आणि मतदान करणं शक्य नसल्याने यंदाच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची रिकामीच राहणार आहे.दरम्यान, व्हायरल झालेल्या वरळीतील पबमधील व्हिडीओंवरूनही देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. सोशल डिस्टंसिंग हे शिवजयंतीला असते. नाईट लाइफला तर सरकारने परवानगी दिलेली आहे. बाकी मुख्यमंत्री आपल्या मंत्र्यांना सल्ले देत नाहीत, कारण मंत्री आपल्याला ऐकत नाहीत, हे त्यांना माहिती आहे. सरकारमधी अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतात. त्यामुळे ते स्वत:च सगळे निर्णय घेतात असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारण