शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Devendra Fadnavis PC: “भाजपा नारायण राणे यांच्या ठामपणे पाठिशी; आमच्या पक्ष कार्यालयावर हल्ला केला तर...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 13:25 IST

Narayan Rane vs Shivsena: शरगील उस्मानी महाराष्ट्रात येतो, भारतमातेला शिव्या देतो. त्याच्यावर कारवाई करण्याची तुमची हिंमत नाही. परंतु नारायण राणे यांना पकडण्यासाठी अख्खं पोलीस दल कामाला लावलं आहे.

ठळक मुद्देनिष्पक्ष पोलीस दल म्हणून महाराष्ट्र पोलिसांची ख्याती आहे. सरकारपुढे काहीजण लोटांगण घालत आहे.केवळ सरकारला खुश करण्यासाठी पोलीस दल कारवाई करायला लागलं तर महाराष्ट्राची प्रतिमा चांगली राहणार नाही ठाकरे सरकार हे पोलिसजीवी झालंय. कोर्टाने चपराक दिल्यानंतर बदला घेण्यासाठी पोलिसांचा वापर सरकारकडून करायचं हे योग्य नाही.

मुंबई – मुख्यमंत्री पद हे महत्त्वाचं पद आहे. त्यापदावरील व्यक्तीबद्दल बोलताना संयम बाळगणं आवश्यक आहे हे आमचं मत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विसरतात. त्यामुळे कुणाच्या मनात संताप तयार होऊ शकतो. नारायण राणेंवर सरकार ज्याप्रकारे कारवाई करतंय त्याचे समर्थन बिल्कुल करता येत नाही. भारतीय जनता पार्टी राणे साहेबांच्या त्या वक्तव्याशी मागे नसेल. परंतु नारायण राणे(Narayan Rane) यांच्या पाठिशी भाजपा उभा राहील असा विश्वास देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.

यावेळी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरगील उस्मानी महाराष्ट्रात येतो, भारतमातेला शिव्या देतो. त्याच्यावर कारवाई करण्याची तुमची हिंमत नाही. परंतु नारायण राणे यांना पकडण्यासाठी अख्खं पोलीस दल कामाला लावलं आहे. कायद्याच्या भाषेत नारायण राणेंनी कुठलाही गुन्हा केला नाही. पण त्याचं गुन्ह्यात जबरदस्ती रुपांतर करायचं? पोलीस आयुक्तांच्या पत्रात मुसक्या बांधा, हजर करा ते स्वत:ला समजतात काय? नारायण राणेंची बाजू ऐकून न घेता कलमं कशी लावली? पोलिसांचा गैरवापर केला जात आहे. पोलिसांबद्दल नितांत आदर आहे. निष्पक्ष पोलीस दल म्हणून महाराष्ट्र पोलिसांची ख्याती आहे. सरकारपुढे काहीजण लोटांगण घालत आहे. केवळ सरकारला खुश करण्यासाठी पोलीस दल कारवाई करायला लागलं तर महाराष्ट्राची प्रतिमा चांगली राहणार नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच ठाकरे सरकार हे पोलिसजीवी झालंय. कोर्टाने चपराक दिल्यानंतर बदला घेण्यासाठी पोलिसांचा वापर सरकारकडून करायचं हे योग्य नाही. मी धमकी देत नाही सल्ला देतो. पोलिसांनी कायद्याने काम करावं. बेकायदेशीर काम करणारे पोलीस कुठे आहेत हे मी सांगण्याची गरज नाही. तीन पथकं नारायण राणेंना पकडण्यासाठी जातात. नारायण राणे यांच्या वक्तव्याचं समर्थन नाही परंतु बेकायदेशीरपणे सरकार पोलिसांचा गैरवापर करतंय. त्यामुळे नारायण राणे यांच्या पाठिशी भाजपा ठाम उभी राहणार आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"युवासेनेच्या कार्यकर्त्यांवर हात उचलणाऱ्या पोलिसांचे निलंबन करावं"

भाजपा कार्यालयावर हल्ला केला तर सहन करणार नाही

आम्ही राडा करत नाही, हिंसाचार करत नाही परंतु आमच्या कार्यालयावर हल्ला झाले तर आम्ही रस्त्यावर येऊन लढणारे लोकं आहोत. कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांना अटक केली नाही तर दोन्ही विरोधी पक्षनेते संबंधित पोलीस ठाण्यासमोर जाऊन ठिय्या आंदोलन करु, इथं तालिबानी राज्य नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

नाशिकमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून भाजपाच्या कार्यालयावर दगडफेक

भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झालेला असताना नाशिकच्या भाजपा कार्यालयाबाहेर कोणताही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला नव्हता. युवासेनेचे चार कार्यकर्ते एका कारमधून कार्यालयाबाहेर आले आणि त्यांनी भाजपा कार्यालयावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात भाजपा कार्यालयाच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. यानंतर दगडफेक करणाऱ्यांनी नारायण राणेंविरोधात घोषणाबाजी करत माफी मागा नाहीतर परिणाम आणखी वाईट होतील असा इशारा देखील त्यांनी दिला.

नारायण राणेंच्या अटकेचे आदेश

नारायण राणेंच्या विरोधात कलम ५००, ५०२, ५०५, १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणेंच्या विधानानं समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी आशयाची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नाशिक पोलिसांनी राणेंच्या अटकेचे आदेश काढले. राणे राज्यसभेचे खासदार असल्यानं त्यांच्या अटकेवेळी प्रोटोकॉलचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राणेंना अटक केल्यानंतर त्याबद्दलची माहिती राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना देण्यात येईल. हिंदी किंवा इंग्रजीत ही माहिती त्यांना दिली जाईल.

मी असतो तर कानाखाली चढवली असती

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू असून, मुंबई, वसई-विरारनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा कोकणात दाखल झाली होती. रायगडमधील महाड येथे पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना नारायण राणे यांची जीभ घसरली आणि मी असतो तर कानाखाली चढवली असती, असे खळबळजनक आणि वादग्रस्त विधान नारायण राणे यांनी केले. त्यामुळे शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणे BJPभाजपाShiv Senaशिवसेना