शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट; नेमकं कारण काय?, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 13:36 IST

Devendra Fadnavis Meet Sharad Pawar: राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.

Devendra Fadnavis Meet Sharad Pawar: राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. पवार-फडणवीस भेटीमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांच्या ट्विटर हँडलवर पवारांसोबतच्या भेटीचा फोटो ट्विट करुन याची माहिती दिली आहे. फडणवीसांनी यावेळी शरद पवारांची सदिच्छा भेट घेतल्याचं नमूद केलं आहे. पण याभेटीमागे अनेक कारणं असल्याचं बोललं जात आहे. 

मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात सध्या पेटला आहे. सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षण रद्द करण्यात आल्यानंतर राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. याच मुद्द्यावरुन भाजपचे खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी नुकतंच आक्रमक भूमिका घेतली. संभाजी राजे यांनी राज्यातील सर्व नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर राज्य सरकारसमोर काही मागण्या ठेवल्या असून त्यासाठी ६ जूनपर्यंतची अंतिम मूदत दिली आहे. संभाजी राजे यांनी देवेंद्र फडणवीस आणि पवार यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यातील ओबीसी आरक्षणावरुन कोर्टानं दिलेल्या निर्णयावरुनही दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची शक्यता आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याला राज्य सरकार पूर्णपणे जबाबदार असून गेल्या १५ महिन्यांमध्ये या प्रश्नाकडे सरकारनं दुर्लक्ष केल्यामुळे ओबीसी समाजाला आजचा दिवस पाहावा लागल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेनंतर फडणवीसांनी शरद पवार यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवार