शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"मुख्यमंत्र्यांचं सभागृहातील भाषण चौकातल्या भाषणाप्रमाणे, त्यात महाराष्ट्र आलाच नाही’’

By बाळकृष्ण परब | Updated: March 3, 2021 17:53 IST

Devendra Fadanvis Criticize CM Uddhav Thackeray's Speech : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेल्या भाषणाची चिरफाड केली आहे.

मुंबई - राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेतला होता. (CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha) मात्र आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेल्या भाषणाची चिरफाड केली आहे. मुख्यमंत्री आधी नवखे होते. मात्र त्यांना आता पद सांभाळून बरेच दिवस झाले आहेत. मात्र अजूनही त्यांना चौकातलं भाषण आणि सभागृहातलं भाषण यातील फरक कळलेला नाही. मुख्यमंत्री आजच्या भाषणामधून सगळीकडे फिरून आले. मात्र अखेरपर्यंत त्यांच्या भाषणात महाराष्ट्र आलाच नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.  (Devendra Fadanvis Criticize CM Uddhav Thackeray's Speech in Assembly )विधिमंडळामध्ये राज्यपालांच्या अभिषाणावर झालेल्या चर्चेवेळी विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. तसेच सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढत मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य केले होते. दरम्यान, आज सभागृहात बोलताना मुख्यमंत्र्यांनी या टीकेचा खरपूस समाचार घेतला होता. तसेच भाजपा आणि केंद्र सरकारला लक्ष्य करत सरकारवरील आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या उत्तराला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता पद सांभाळून बरेच दिवस झाले आहेत. मात्र अजूनही त्यांना चौकातलं भाषण आणि सभागृहातलं भाषण यातील फरक कळलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सगळे उल्लेख केले. ते पंजाबमध्ये गेले, चीनमध्ये गेले, दिल्लीत गेले, अमेरिकेत गेले, दक्षिणेतही पोहोचले. मात्र त्यांच्या भाषणात महाराष्ट्र आला नाही.   मुख्यमंत्र्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या विजेच्या जोडण्या तोडल्याबाबत दु:ख व्यक्त केले. मात्र महाराष्ट्रातील साडेतीन लाख शेतकऱ्यांची वीज कापली त्यावर काहीही बोलले नाहीत. कोरोनाकाळात झालेल्या भ्रष्टाचारावही मुख्यमंत्र्यांनी एक चकार शब्द काढला नाही, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस