शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

देश व लोकशाही वाचविण्यासाठी विरोधकांचा एकजुटीचा निर्धार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 06:42 IST

दंगली व विद्वेष पसरविणाऱ्या, देशातील घटनात्मक संस्था मोडून टाकणा-या मोदी सरकार व भाजपाला धडा शिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र यायलाच हवे.

कोलकाता : दंगली व विद्वेष पसरविणाऱ्या, देशातील घटनात्मक संस्था मोडून टाकणा-या मोदी सरकार व भाजपाला धडा शिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र यायलाच हवे. तसे न केल्यास भाजपा लोकशाहीदेखील पायदळी तुडवेल. त्यामुळे देश व लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो असून, जनतेनेही दुसºया स्वातंत्र्यासाठी तयार राहावे. औषधांप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुदत आता संपली आहे. येत्या लोकसभा निवडणुकांनंतर देशाला नवा पंतप्रधान मिळेल, हे नक्की. तो कोण असेल, याचा विचार नंतर करता येईल, असे सांगत, सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शनिवारी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांतील भाजपाच्या पराभवानंतर सारे विरोधक प्रथमच एकत्र आले होते. त्यामुळे ही जाहीर सभा २२ विरोधी पक्षांच्या ऐक्याचे दर्शनच होते. परेड ग्राउंडवर ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने झालेल्या सभेला सुमारे ८ लाख लोक हजर होते. भाजपाचे खा. शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह वाजपेयी सरकारधील अरुण शौरी, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांनीही मोदी सरकारवर सडकून टीका केली. मोदी नव्हे, तर जनतेचे प्रश्नच अधिक महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन सिन्हा यांनी केले, तर जीएसटी घाईघाईत लागू केल्याने अर्थव्यवस्था कोलमडल्याची टीका अरुण शौरी यांनी केली. खरे बोलणे ही बंडखोरी असेल, तर होय, मी बंडखोर आहे, असे शत्रुघ्न सिन्हा ठामपणे म्हणाले.मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपामुळे लोकशाही धोक्यात आल्याची टीका केली, तर दंगली पसरविण्याचे काम भाजपा करीत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. शरद पवार यांनी आपल्याला आता राजकीय महत्त्वाकांक्षा नाही, असे सांगतानाच, लोकशाही व घटनात्मक संस्था बळकट ठेवण्यासाठी राजकीय परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे सांगितले. देवळांद्वारे भाजपा धार्मिक विद्वेष व तणाव पसरवत असल्याची टीका चंद्राबाबू नायडू यांनी केली. हार्दिक पटेल यांनी ‘सुभाषचंद्र बोस गोºयांशी लढले, तर आता आपल्याला चोरांशी लढायचे आहे, असे उद्गार काढले.देश अखंड ठेवण्यासाठी मोदी सरकार हटविणे गरजेचे आहे, असे फारुक अब्दुल्ला म्हणाले. देशाला मोदी हुकूमशाहीकडे नेत असून, जनतेने दुसºया स्वातंत्र्यासाठी तयार राहावे, असे स्टॅलिन म्हणाले. गेगांग अपांग व झोराम नॅशनल फ्रंटचे लालडुहावमा यांनी नागरिकत्व विधेयकामुळे ईशान्येकडील राज्ये वेगळी पडत असल्याचा इशारा दिला. रोजगार देण्यातील अपयश, नोटाबंदी व जीएसटीमुळे गेलेल्या नोकºया, अल्पसंख्यांक व दलितांवरील अत्याचार, राफेल घोटाळा, विरोधी सरकारे पाडण्याचा प्रयत्न यांवरूनही या नेत्यांनी टीकेची झोड उठविली.>व्यासपीठावर नेत्यांची मांदियाळीचकाँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे व अभिषेक मनु सिंघवी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, दिल्लीचे अरविंद केजरीवाल, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, सपाचे अखिलेश यादव, राष्ट्रीय लोक दलाचे अजित सिंग, द्रमुकचे एम. के. स्टॅलिन, अलीकडेच भाजपातून बाहेर पडलेले अरुणाचलचे माजी मुख्यमंत्री गेगांग अपांग, पाटीदारांचे नेते हार्दिक पटेल, दलित नेते जिग्नेश मेवाणी, बसपाचे नेते सतीशचंद्र मिश्रा, लोकतांत्रिक जनता दलाचे शरद यादव, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, आसामच्या युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटचे बद्रुद्दिन अजमल, राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी मोदी सरकारवर हल्ला चढविताना, पंतप्रधानपदाबाबत मतभेद नसल्याचा दावा केला.