शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

DDC Election : काश्मीरमध्ये पहिल्यांदा भाजपचं 'कमळ' उमललं; तीन जागांवर विजय 

By मोरेश्वर येरम | Updated: December 22, 2020 18:29 IST

भाजपने स्थानिक बलाढ्य पक्षांना धूळ चारत काश्मीरमध्ये विजयाचं खातं उघडलं आहे. 

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषद निवडणुकीत भाजपला यशकाश्मीर खोऱ्यात भाजपचे तीन उमेदवार विजयीकाश्मीरमध्ये पहिल्यांदाच भाजपला जिल्हा पातळीवर यश

काश्मीरएकवेळ अशी होती की काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाचं (भाजप) अस्तित्वच नव्हतं. आज त्याच काश्मीर खोऱ्यात भाजप 'कमळ' उमललं आहे. भाजपने जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत (डीडीसी) नॅशनल कॉन्फरंस आणि पीडीपीसारख्या स्थानिक बलाढ्य पक्षांना धूळ चारत काश्मीरमध्ये विजयाचं खातं उघडलं आहे. 

भाजपच्या ऐजाज हुसैन यांनी श्रीनगरच्या खोंमोह-२ (Khonmoh-II) जागेवर आणि ऐजाज अहमद खान यांनी बांदीपोरा जिल्ह्यातील तुलैल येथे विजय प्राप्त केला आहे. दुसरीकडे पुलवामा जिल्ह्यात काकपोरा जागेवरही भाजपच्या मुन्ना लतीफ यांचा विजय झाला आहे. काश्मीर खोऱ्यातील विजय भाजपसाठी अत्यंत मोठा विजय मानला जात आहे. 

ऐजाज हुसैन यांनी आपल्या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मार्गदर्शन आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आज काश्मीरमध्ये कमळ उमललं आहे. या निवडणुकीत भाजप एका बाजूला तर दुसरीकडे इतर सर्वपक्ष होते. लोकांनी पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास दाखवला. आजचा निकाल इतर पक्षांना एक जोरदार संदेश देणारा निकाल आहे", असं ऐजाज हुसैन म्हणाले. 

"देशाच्या विरोधात काम करणाऱ्या गुपकर आघाडीच्या विरोधात भाजपने जोरदार लढत दिली आहे. निवडणुकीचे निकाल काय लागतील याची आधीच कल्पना असल्यानं गुपकर आघाडीतील पक्ष घाबरुन एकत्र आलेत. त्यांच्या विरोधानंतरही भाजपने विजय प्राप्त केला आहे", असंही हुसैन म्हणाले. 

जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेसाठी २८० जागांसाठी एकूण ८ टप्प्यांमध्ये मतदान झालं आहे. या निवडणुकीत एकूण २१७८ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. महत्वाची बाब म्हणजे कलम ३७०, ३५-अ रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. यंदाची निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्वाची आहे. संपूर्ण शक्ती पणाला लावून भाजपने या निवडणुकीत प्रचार केला होता. त्याचं फळ देखील भाजपला मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. २८० जागांपैकी २३१ जागांचे निकाल हाती आले आहेत. यात ५४ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर गुपकर आघाडीचे उमेदवार ९५ जागांवर आघाडीवर आहेत.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा