शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

Dadra Nagar Haveli Bypoll: शिवसेना इतिहास नोंदवणार; महाराष्ट्राबाहेरील पहिला खासदार दणक्यात निवडून येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 13:04 IST

भाजपाकडून या जागेवर महेश गावित यांना उमेदवारी देण्यात आली. तर काँग्रेसनं महेश धोडी यांना तिकीट दिलं. हे दोन्ही उमेदवार शिवसेना उमेदवाराच्या खूप मागे आहेत.

नवी दिल्ली – केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील खासदार मोहन डेलकर यांच्या संशयास्पद आत्महत्येने खळबळ माजली होती. त्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी मोहन डेलकर यांच्या निधनानं रिक्त झालेल्या लोकसभा जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. यात शिवसेनेने मोहन डेलकर(Mohan Delkar) यांच्या पत्नी कलावती डेलकर यांना उमेदवारी देत निवडणुकीत रंगत आणली. सुरुवातीच्या मतमोजणीपासून कलावती डेलकर आघाडीवर आहेत. काँग्रेस-भाजपा उमेदवारापेक्षा कलावती डेलकर यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

भाजपाकडून या जागेवर महेश गावित(BJP Mahesh Gavit) यांना उमेदवारी देण्यात आली. तर काँग्रेसनं महेश धोडी यांना तिकीट दिलं. हे दोन्ही उमेदवार शिवसेना उमेदवाराच्या खूप मागे आहेत. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरील शिवसेनेचा पहिला खासदार दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्याची शक्यता अधिक आहे. याठिकाणी १९८९ पासून आजपर्यंत मोहन डेलकर हे लोकसभा निवडणुकीत जिंकत आले आहेत. ७ वेळा त्यांनी निवडणूक जिंकली. त्यानंतर आता त्यांच्या पत्नी कलावती डेलकर यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे.

मोहन डेलकर यांच्या कुटुंबातील व्यक्तीला तिकीट देऊन शिवसेनेने भाजपा-काँग्रेसविरोधात दंड थोपटले. भाजपाने येथील आदिवासी चेहरा महेश गावित यांना तिकीट दिले होते. कलावती डेलकर(Kalavati Delkar) यांच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी त्यांचा मुलगा अभिनव डेलकर सांभाळत होता. या निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी दादरा-नगर येथे जाऊन जोरदार प्रचार केला होता. कलावती डेलकर मोठ्या फरकाने निवडून येतील असा दावा संजय राऊत यांनी केला होता. तो प्रत्यक्षात येताना दिसत आहे.

मुंबईच्या हॉटेलमध्ये मिळाला होता मृतदेह

खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह मुंबईच्या एका हॉटेलमध्ये सापडला होता. त्यानंतर या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. मोहन डेलकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती त्यात दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. डेलकर यांच्या पत्नी कलावती आणि मुलगा अभिनव यांनी सुसाईड नोटच्या सहाय्याने पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी SIT गठीत करत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. सध्या हा तपास सुरू आहे.

कोण होते मोहन डेलकर?

मोहन डेलकर हे दादरा-नगर हवेली मतदारसंघाचे खासदार होते. १९८९ मध्ये ते अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर १९९१, १९९६ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर त्यांनी विजय मिळवला. १९९८, १९९९, २००४ मध्ये मोहन डेलकर हे भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत पुन्हा जिंकले. त्यानंतर काही काळांनी भाजपाला रामराम करत २००९ मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये सहभागी झाले. १० वर्षांनी म्हणजे २०१९ मध्ये काँग्रेसमधून राजीनामा देत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत त्यांनी खासदारकी पटकावली.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा