शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

“कोरोनापेक्षा देश धार्मिक कट्टरता अन् प्रखर राष्ट्रवादाचा शिकार”; माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींचा निशाणा

By प्रविण मरगळे | Updated: November 21, 2020 10:37 IST

Former Vice President Hamid Ansari News: कोविड हा एक अतिशय वाईट साथीचा रोग आहे, परंतु त्याआधी आपला समाज धार्मिक कट्टरता आणि प्रखर राष्ट्रवादाच्या दोन साथीच्या आजारांना बळी पडला आहे

नवी दिल्ली – आज देश अशा विचारसरणींमुळे धोक्यात आला आहे जो 'आम्ही आणि ते' या काल्पनिक गटाच्या आधारे देशाचं विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना विषाणूच्या संकटापूर्वी भारतीय समाज दोन अन्य महामारीचा शिकार झाला आहे, यात “धार्मिक कट्टरता अन् प्रखर राष्ट्रवाद" यांचा समावेश आहे. तर या दोन्हींच्या तुलनेत देशप्रेम आणि सकारात्मक भावना ही सैन्य व सांस्कृतिकदृष्ट्या सुरक्षात्मक आहे असं  माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी शुक्रवारी सांगितले

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांच्या 'द बॅटल ऑफ बेलॉन्गिंग' या नवीन पुस्तकाच्या डिजिटल प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या मते, चार वर्षांच्या अल्पावधीतच, भारत उदारमतवादी राष्ट्रवादाच्या मूलभूत दृष्टीकोनातून सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नवीन राजकीय दृष्टीकडे वाटचाल करत आहे. जी सार्वजनिक क्षेत्रात दृढपणे कार्यरत आहे. कोविड हा एक अतिशय वाईट साथीचा रोग आहे, परंतु त्याआधी आपला समाज धार्मिक कट्टरता आणि प्रखर राष्ट्रवादाच्या दोन साथीच्या आजारांना बळी पडला आहे.” धार्मिक कट्टरपणा आणि कट्टरपंथी राष्ट्रवादाच्या तुलनेत. देशप्रेम ही अधिक सकारात्मक संकल्पना आहे असं हमीद अन्सारी म्हणाले.

या पुस्तकाच्या प्रकाशन दरम्यान चर्चेत भाग घेत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला म्हणाले की, "१९४७ मध्ये आम्हाला पाकिस्तानबरोबर जाण्याची संधी होती, परंतु माझ्या वडिलांना आणि इतरांना असं वाटलं की, दोन राष्ट्रांचं तत्त्व आमच्यासाठी चांगले नाही. सध्याचं सरकार ज्यादृष्टीने देशाकडे पाहत आहे, त्याला कधीही स्वीकारणार नाही असं फारूक अब्दुलांनी सांगितले.

टॅग्स :Indiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या