शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: राज्य शासनाने पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा दर्जा द्यावा, रामदास आठवले यांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 22:49 IST

Coronavirus in Maharashtra : लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांना महाराष्ट्र शासनाने कोविड फ्रंटलाईन वॉरियर्स कोरोना योद्ध्याचा दर्जा द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

मुंबई - कोरोना चा कहर वाढत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता पत्रकार वृत्तांकन करून जनते पर्यंत महत्वाची माहिती पोहोचवीत असतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांना महाराष्ट्र शासनाने कोविड फ्रंटलाईन वॉरियर्स कोरोना योद्ध्याचा दर्जा द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. (State government should give corona warrior status to journalists, demands Ramdas Athavale)

 पत्रकारांना कोविड फ्रंटलाईन वॉरीयर्स अर्थात कोरोना योद्धा पदाचा दर्जा पंजाब ;मध्य प्रदेश; पश्चिम बंगाल; ओरिसा; बिहार या राज्यांनी दिला आहे.महाराष्ट्राला महनीय पत्रकारांची परंपरा लाभली आहे.ज्यांनी अखिल भारताचे नेतृत्व केले आहे.महाराष्ट्र राज्य नेहमी पत्रकारांचा सन्मान करणारे राज्य आहे. मात्र आता राज्यात महाविकास आघाडी सरकार ने पत्रकारांच्या बाबतीत उपेक्षेचे धोरण दिसत आहे. लॉक डाऊन च्या काळात अत्यावश्यक सेवे मध्ये ही पत्रकारांचा समावेश महाविकास आघाडी सरकार ने केलेला नाही.परिणामी पत्रकार आणि कॅमेरामन फोटोग्राफर यांना रेल्वे प्रवास करता येत नाही. अन्य राज्यांत पत्रकारांना कोरोना फ्रंटलाईन वारॉयर्स चा दर्जा दिला असताना महाराष्ट्रात पत्रकारांना रेल्वे प्रवासाची अत्यावश्यक सेवेत नोंद घेतली जात नाही.ही खेदजनक बाब आहे.पत्रकारांच्या मागण्यांची  उपेक्षा महाविकास आघाडी सरकारने करू नये.राज्यातील पत्रकारांना कोरोना योध्याचा दर्जा देऊन त्यांचा सन्मान राखावा. महाराष्ट्रात कोरोना चा या बिकट काळात 124 पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू  झाला आहे.त्यांच्या कुटुंबियांना  राज्य सरकार ने सांत्वनपर मदत केली पाहिजे. पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा दर्जा देऊन त्यांना लसीकरणा मध्ये प्राधान्य द्यावे तसेच कोरोनामुळे पत्रकारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवाराला सांत्वनपर 50 लाख रुपये मदत निधी द्यावा त्यासाठी कोविड फ्रंटलाईन वॉरियर्स कोरोना योद्धा म्हणून पत्रकारांना दर्जा द्यावा अशी मागणी ना रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे पत्र पाठवून केली आहे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJournalistपत्रकार