शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

coronavirus: "मुंबईत कोरोनाचा कहर, उपनगरचे पालकमंत्री ताडोबाच्या सफरीवर? मुंबईला वाचवणार कोण?’’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 21:57 IST

Nitesh Rane Criticize Aditya Thackeray :मुंबईतील जवळपास नियंत्रणात आलेली कोरोनाची परिस्थिती आता बिघडू लागली आहे. त्यामुळे मुंबईत नियम अधिक कडक करण्याचे तसेच अंशत: लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले जात आहेत.

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यातील इतर भागांसोबतच राजधानी मुंबईमध्येही कोरोनाचे (Coronavirus in Mumbai) रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. मुंबईतील जवळपास नियंत्रणात आलेली कोरोनाची परिस्थिती आता बिघडू लागली आहे. त्यामुळे मुंबईत नियम अधिक कडक करण्याचे तसेच अंशत: लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले जात आहेत. दरम्यान, मुंबईतील कोरोनाची परिस्थिती बिघडत असताना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)हे सुट्टीवर गेले असून, ते ताडोबाची सफर करत असल्याचा आरोप भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. (Risinig Corona patient in Mumbai While all this is happening Guardian minister Aditya Thackeray is in “Tadoba”?)

नितेश राणे यांनी यासंदर्भात ट्विट करून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यात ते म्हणाले की, राज्यात आणि मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आल्याचे बोलले जात आहे. आज १७ हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. मात्र हे सारे घडत असताना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून ताडोबाच्या सफरीवर असून, ते सुट्टीचा आनंद लुटण्यात व्यस्त आहेत. मग आता मुंबईला वाचणवार कोण? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांत मुंबईतील काही भागांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दररोज हजाराहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. धारावीसारख्या भागातही कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे कोरोनाला रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेNitesh Raneनीतेश राणे corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई