शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

Coronavirus: "केंद्राला चिंता सिंगापूरची, आम्हाला आमच्या मुलांची’’; आपचा मोदी सरकारवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 15:07 IST

Coronavirus in Delhi: कोरोनाच्या सिंगापूर स्ट्रेनबाबत अरविंद केजरीवाल यांनी केलेले विधान केंद्र सरकारने खोडून काढल्यानंतर आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्र सरकारला खरमरीत प्रत्युत्तर दिले आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असतानाच आता कोरोनाच्या सिंगापूर स्ट्रेनवरून राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. (Coronavirus in Delhi) सिंगापूर स्ट्रेनबाबत अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांनी केलेले विधान केंद्र सरकारने खोडून काढल्यानंतर आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ( Manish Sisodia ) यांनी केंद्र सरकारला खरमरीत प्रत्युत्तर दिले आहे. आज भाजपा गलिच्छ राजकारण करत आहे. केजरीवाल यांना मुलांची चिंता आहे आणि केंद्र सरकार सिंगापूरसाठी चिंतीत आहे, असा टोला सिसोदिया यांनी लगावला.  ( Manish Sisodia Says, "The Central Government is concerned about Singapore, we are concerned about our children" )

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, यापूर्वी लंडनमधून स्ट्रेन आला होता तेव्हा भारत सरकारच्या बेफिकीरीमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला. आज जगभरातील डॉक्टर लहान मुलांना धोका असल्याचा इशारा देत आहेत. त्यातून वेळीच सावध होण्याऐवजी सिंगापूरला मुद्दा बनवण्यात येत आहे. 

कोरोनाच्या पुढच्या लाटेमध्ये लहान मुलांना धोक्यापासून दूर ठेवण्याबाबच चिंता केली पाहिजे. मात्र भाजपाला सिंगापूरच्या प्रतिमेची चिंता आहे. मात्र मुलांची चिंता नाही. भाजपा आणि केंद्र सरकारला परदेशातील इमेजसाठी शुभेच्छा, आम्ही मात्र आमच्या मुलांची चिंता करू, असा टोला सिसोदिया यांनी केंद्र सरकारला लगावला. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिंगापूर स्ट्रेनबाबत चिंता व्यक्त केली होती. या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये केजरीवाल म्हणाले होते की, सिंगापूरमधून आलेले कोरोनाचे नवे रूप मुलांसाठी खूप धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतामध्ये ते तिसऱ्या लाटेच्या रूपात येऊ शकते. केंद्र सरकारला माझे आवाहन आहे की, त्यांनी सिंगापूरसोबत असेलली विमानसेवा तत्काळ प्रभावाने रद्द करावी. तसेच मुलांसाठीही लसीच्या पर्यायांवर प्राथमिकतेच्या आधारावर काम झाले पाहिजे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliticsराजकारणAAPआपBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल