शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोना काळात लोकांमध्ये जाऊन ठळकपणे काम करा, राज्यांतील नेते, कार्यकर्त्यांना भाजपच्या नेतृत्वाचा स्पष्टपणे सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 08:44 IST

Coronavirus: पक्ष नेत्यांनी गरजूंना औषधी, रुग्णालयांत खाटांची उपलब्धता, काम करणारे मॉनिटर, आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधा खात्रीने मिळाव्यात म्हणून ‘सामाजिक उपक्रम’ वाढविण्यास कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर पक्षाची ठळकपणे जाणवलेली अनुपस्थिती आणि जनतेच्या उघडपणे व्यक्त न झालेल्या, पण तीव्र भावनांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेतृत्वाने राज्या-राज्यांतील आपले नेते व कार्यकर्त्यांना लोकांमध्ये जाऊन अगदी स्पष्टपणे व सहानुभूतीपूर्वक काम करण्यास सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्ष नेत्यांनी गरजूंना औषधी, रुग्णालयांत खाटांची उपलब्धता, काम करणारे मॉनिटर, आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधा खात्रीने मिळाव्यात म्हणून ‘सामाजिक उपक्रम’ वाढविण्यास कार्यकर्त्यांना सांगितले आहे. या पायाभूत सुविधांमध्ये सरकारी रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांटस उभारण्याचाही समावेश आहे.भाजप आणि सरकार यांच्याबद्दल नकारात्मक कथन केले जात आहे हे खरे, असे भाजपच्या नेत्याने मान्य केले. परिस्थिती जेव्हा सामान्य बनेल तेव्हा आम्ही त्या कथनाला उत्तर देऊ शकू. आताची वेळ ही अनेकांनी त्यांच्या कुटुंबातील जीवलग गमावलेले आहेत. आम्ही त्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्याची आहे. त्यांच्या अडचणी दूर करून त्यांच्यासोबत उभे राहण्याची आहे. राज्यांतील पक्ष नेते, तसेच कार्यकर्ते यांना त्यांनी लोकांमध्ये जाऊन प्रभावीपणे आणि सहानुभूतीपूर्वक काम करावे, असे सांगण्यात  आले आहे, असे हा नेता  म्हणाला.ग्रामीण भागात कोरोनाची दुसरी लाट पसरत चालली असताना काँग्रेस सरकारची प्रतिमा कलंकित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप भाजप करीत असताना पक्ष नेत्यांना लोकांमध्ये जाण्यास सांगण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपा