शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

आता राहुल गांधींना एकदा संधी देऊन बघू या - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 22:24 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या सभेत मोदींवर जोरदार प्रहार केला आहे.

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या सभेत मोदींवर जोरदार प्रहार केला आहे. मोदींनी देश खड्ड्यात घातल्याचा उल्लेखही त्यांनी केला. ते म्हणाले, नेहरू हे देशाचे पंतप्रधान हे महात्मा गांधींनी ठरवलं, त्यावेळेला पर्याय ठेवला नव्हता, त्यानंतर जितके देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा लोकांना पर्याय होता का? मग आताच ही पर्यायाची चर्चा का? नरेंद्र मोदींनी जितका देश खड्ड्यात घातलाय, ह्या पेक्षा अजून खड्ड्यात घालणारा कोण येणार आहे ?, नरेंद्र मोदींना संधी दिली, त्यांनी देश खड्ड्यात घातला, आता राहुल गांधींना संधी देऊन बघू या, खड्ड्यात घालतील किंवा देशाचं चांगलं देखील करून दाखवतील. पण संधी तर देऊन बघू या, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरेंनी एक प्रकारे काँग्रेसला समर्थन दिलं आहे. 

देश इतका खड्ड्यात घालून पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर हे पुन्हा पैसे वाटायला येत आहेत, मी सांगतो आले पैसे द्यायला तर घ्या, कारण हे तुमचेच पैसे आहेत. ह्या लोकांच्या पार्श्वभागावर लाथ मारा आणि हाकलून द्या. मोदी आणि शाह हे राजकीय क्षितिजावरून घालवायची म्हणून काळजावर दगड ठेवून मतदान करा, असं आवाहनही राज ठाकरेंनी मतदारांना केलं आहे. काँग्रेसच्या जुन्या योजनांची नावं बदलून त्यांनी त्या भाजपाच्या योजना म्हणून घोषित केल्या. काँग्रेसला नेहरू गांधींच्या पलीकडे नावं देता येत नाहीत, भाजपाला पंतप्रधान किंवा भाजप हीच का नावं सुचतात. आपल्या देशात इतकी कर्तृत्ववान माणसं जन्माला आली पण त्यांची नावं प्रकल्पांना का देत नाहीत, असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.राजीव गांधी, इंदिरा गांधींची हत्या झाली, त्यावेळी अनेकांनी काँग्रेसला मतदान केलं. देश संकटात आल्यास वेगळा विचार करणं गरजेचं असतं. सेनेचा उमेदवार भाजपाला नको, तर भाजपाचा उमेदवार सेनेला नको आहे, मनात नसतानाही सत्तेसाठी या लोकांनी युती केली. काँग्रेसकडून प्रतिभाताईंचं नाव आलं, त्यावेळी बाळासाहेबांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्या त्या वेळेला परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. अमित शाह आणि नरेंद्र मोदी जर असे वागले नसते तर मला असं करावं लागलं नसतं, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधी