शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

पंतप्रधानांचा एकच कायदा, देश फुंकून मित्रांचा फायदा; राहुल गांधींचा मोदी सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 18:45 IST

Rahul Gandhi : पेट्रोल-डिझेल आणि खासगीकरणावरून राहुल गांधींनी साधला पंतप्रधानांवर निशाणा

ठळक मुद्देपेट्रोल-डिझेल आणि खासगीकरणावरून राहुल गांधींनी साधला पंतप्रधानांवर निशाणादेशात काही ठिकाणी पेट्रोलनं गाठली शंभरी

काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी रविवारी पुन्हा एकदा मोदी सरकारवरपेट्रोल-डिझेलचे दर, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची कथितरित्या विक्री आणि एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या दरांवरून निशाणा साधला. तसंच यावेळी केंद्र सरकारकडून दिवसा लूट केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. "केंद्र सरकारची दोन्ही हातांनी दिवसा लूट. गॅस-डिझेल-पेट्रोलवर जबरदस्त कर वसूली आणि मित्रांना पीएसयू-पीएसबी विकून जनतेकडून हिस्सा, रोजगार आणि सुविधा हिरावून घेणं. पंतप्रधानांचा एकच कायदा, देश फुंकून मित्रांचा फायदा," असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधानांवर टीका केली. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींवर काँग्रेसकडून सातत्यानं सरकारवर टीका केली जात आहे. सरकारनं २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पेट्रोलियम उत्पादनांवर कर लावून २१ लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक महसूल गोळा केला असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येतआहे. दरम्यान, संसदेतही काँग्रेसनं यावरून गदारोळ केला होता. तसंच यावर चर्चेची मागणीही केली होती. २०२१ या वर्षाच्या सुरूवातीच्या दोन महिन्यांमध्ये पेट्रोलच्या दरात ४.८७ रूपये प्रति लिटर आणि डिझेलच्या दरात ४.९९ रूपये प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील अनुपपूर आणि राजस्थानमधील श्री गंगानगर या ठिकाणी इंधनाच्या दरानं शंभरी पार केली आहे. तर दुसरीकडे एलपीजी सिलिंडरच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सामान्यांच्या खिशावर याचा ताण पडत आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीPetrolपेट्रोलDieselडिझेलCylinderगॅस सिलेंडरGovernmentसरकार