शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
6
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
7
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
8
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
9
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
10
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
11
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
12
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
13
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
14
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
15
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
16
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
17
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
18
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
19
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...

काँग्रेसने निवडला गुलाम नबी आझाद यांचा उत्तराधिकारी, आता या नेत्याकडे राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी

By बाळकृष्ण परब | Published: February 12, 2021 11:59 AM

Congress News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेतील विरोधीपक्ष नेतेपदी आझाद यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड केली आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे कर्नाटकमधील नेते अलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांना राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातेखर्गे यांनी यापूर्वी लोकसभेमध्येही पक्षाचे नेते म्हणून काम पाहिले होते२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांना राज्यसभेचे सदस्यत्व देण्यात आले होते

नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेतील विरोधीपक्ष नेतेपदी आझाद यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड केली आहे. आझाद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर काँग्रेसने पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी निवड केली आहे. ( Mallikarjun Kharge is New  Leader of Opposition in Rajya Sabha)काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस वेणुगोपाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, काँग्रेसने (Congress) राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना नव्या विरोधीपक्षनेत्याबाबतची माहिती दिली आहे. आझाद हे कार्यमुक्त झाल्यानंतर आता मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी नामांकित करण्यात आले आहे. त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे हे राज्यसभेमधील पुढील विरोधीपक्षनेते असतील.

काँग्रेसचे कर्नाटकमधील नेते अलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांना राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाते. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांना राज्यसभेचे सदस्यत्व देण्यात आले होते. खर्गे यांनी यापूर्वी लोकसभेमध्येही पक्षाचे नेते म्हणून काम पाहिले होते.दरम्यान, राज्यसभेमध्ये १५ फेब्रुवारीनंतर जम्मू काश्मीरमधील कुठलाही प्रतिनिधी नसेल. सध्या येथून राज्यसभेवर चार सदस्य आहेत. मात्र कलम ३७० हटवून जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यापासून येथे निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीत तिथून राज्यसभेवर नवा सदस्य निवडून येणार नाही. पीडीपीचे खासदार नझीर अहमद लावे (१० फेब्रुवारी) आणि मीर मोहम्मद फैयाज (१५ फेब्रुवारी) यांचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. तर गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ (१५ फेब्रुवारी) आणि भाजपाचे खासदार शमशेर सिंह मन्हास यांचा कार्यकाळ १० फेब्रुवारीला संपत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणRajya Sabhaराज्यसभा