शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

'संस्कृती बदनाम करण्याचा काँग्रेसचा डाव'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 05:45 IST

सध्या काँग्रेस आणि त्यांची महामिलावट आघाडी देशाला तोडणारा जाहीरनामा प्रसिद्ध करून मते मागत आहे,

निपाणी : सध्या काँग्रेस आणि त्यांची महामिलावट आघाडी देशाला तोडणारा जाहीरनामा प्रसिद्ध करून मते मागत आहे, पण देशभक्तीला मतदान करायचं की वंशपरंपरेला हे तुमच्या हातात आहे. भाजपने नेहमीच आपली संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न केले आहेत, पण काँग्रेसने मात्र आपल्या संस्कृतीलाच बदनाम करण्याचं काम चालवलं आहे, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केला. चिक्कोडी येथील बी. के. महाविद्यालयाच्या समोरील मैदानात भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले व सुरेश अंगडी यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत मोदी बोलत होते.कर्नाटकात सत्तेत असलेल्या काँग्रेस-निजद सरकारने केलेली कर्जमाफी अद्याप संपूर्ण शेतकऱ्यांना मिळालेली नाही. मग या कर्जमाफीचं काय झालं? केंद्र सरकारने सुरू केलेल्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभही कर्नाटकातील शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने मिळालेला नाही, याला कारणीभूत कर्नाटकातील काँग्रेस-निजद सरकारच आहे, असा आरोपही त्यांनी केला.आपले सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास शेतकरी सन्मान योजनेचा लाभ सर्व शेतकºयांना देणार आहे. एवढेच नव्हे तर वयाची साठ वर्षे पूर्ण केलेल्या शेतमजुरांना पेन्शन व पशुपालकांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात येतील. मुलांना शिक्षण, युवकांना नोकरी, वृद्धांना औषधे, शेतकºयांना सिंचन व प्रत्येकाला महागाईपासून मुक्ती अशी विकासाची पंचसूत्री राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.>साखरेचा दर ठरविणारशेतकºयांना अधिकचे उत्पन्न मिळावे यासाठी उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देणार आहे. तसेच साखरेचे मूल्यांकन करून दर निश्चित करण्यात येईल, असेही मोदी यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक