शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या उमेदवारीने ‘स्वाभिमानी’ला धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 05:22 IST

बुलडाण्यासाठी शेट्टी आग्रही; राज्यातील चार मतदार संघांवर दावा

- राजेश शेगोकार अकोला : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेसच्या नेतृत्वातील महाआघाडीत सहभागी होण्यासाठी सहा जागांचा प्रस्तावही औपचारिक स्वरूपात दिला असून, त्यामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होता; मात्र काँग्रेसने या जागेवर चारूलता टोकस यांच्या नावाची शिफारस पक्ष हायकमांडकडे करण्याचा निर्णय घेतल्याने स्वाभिमानीला धक्का बसला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हातकणंगले, माढा व विदर्भातील वर्धा, बुलडाणा या चार मतदारसंघांचा प्रस्ताव काँग्रेस-राष्ट्रवादीकडे दिला आहे. स्वाभिमानीकडून वर्ध्यातून सुबोध मोहिते व बुलडाण्यातून रविकांत तुपकर लढण्याच्या तयारीत आहेत. या दोन्ही मतदारसंघाच्या माध्यमातून स्वाभिमानीला विदर्भात आपली ताकद वाढवायची आहे; मात्र आता वर्ध्याच्या जागेवर काँग्रेसने चारूलता टोकस यांच्या एकमेव नावाची शिफारस पक्षेश्रष्ठींकडे पाठविली असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या पृष्ठभूमीवर स्वाभिमानीच्या प्रस्तावालाच काँग्रेसने धक्का दिला असल्याने महाआघाडीत स्वाभिमानीच्या प्रवेशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शेकापला गृहीत धरू देणार नाहीशेतकरी कामगार पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडीबरोबर राहणार आहे; पण आम्हाला योग्य सन्मान दिला गेला पाहिजे. आम्हीही त्यांना गृहीत धरूदेणार नाही, असे शेकापचे मराठवाडा विभागीय चिटणीस भाई विकासकाका शिंदे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.मराठवाड्यात शेकापला विधानसभेच्या किमान सहा जागा मिळाव्यात, असा आग्रह आधी आम्ही पक्षाकडे करणार असल्याचे ते म्हणाले.खा. राजू शेट्टींनी मांडलेल्या संपूर्ण कर्जमुक्ती तसेच दीडपट हमीभाव या विधेयकांचा जाहीरनाम्यात समावेश आणि सरकार आल्यावर विधेयक मंजुरीची ग्वाही या सोबतच स्वाभिमानीला सन्मानजनक जागा या अटीवरच आम्ही महाआघाडीत सहभागी होणार आहोत.- रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९