शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

व्हीव्हीपॅटवरून सर्व विरोधक एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 5:17 AM

५० टक्के मतांची मोजणी करा- चंद्राबाबू नायडू

मुंबई : निवडणूक आयोगाची विश्वासार्हता महत्त्वाची की मतांच्या मोजणीसाठी लागणारा वेळ; याचा निर्णय आयोगाने घ्यावा, त्यांनी धृतराष्ट्रासारखी डोळ्यावर पट्टी बांधून बसू नये, असे सांगत ५० टक्के व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी आयोगाने करण्याची विरोधी पक्षाची मागणी कायम आहे. त्यासाठी आम्ही सर्वाेच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करत आहोत, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी विरोधी पक्षांचे देशभरातील नेते हजर होते.‘देश वाचवा, लोकशाही वाचवा’ या विषयाचे प्रेझेंटेशन नायडू यांनी दिले. सत्ताधारी पक्षाकडून ईडी, प्राप्तिकर विभाग, सीबीआयचा गैरवापर होत आहे. देशातील संस्थांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणूक आयोगही त्यास अपवाद नाही, असा आरोपही नायडू यांनी केला. प्राप्तिकर विभागाकडून विरोधी पक्षांना टार्गेट केले जात आहे. निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मशिनबरोबर छेडछाड होत आहे. ईव्हीएम मशिन मॅनिप्युलेट केली जाऊ शकते. १९१ देशांपैकी फक्त १८ देशांनी ईव्हीएम यंत्रणा वापरली आहे. यातील अनेक देश विकसनशील देशात मोडतात. व्हीव्हीपॅटसाठी ९ हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. मग त्यातील ५० टक्के मते मोजण्यावर खर्च करण्यास आयोगाचा विरोध का आहे. हे कळत नाही, असेही नायडू म्हणाले.लोकांचे मत सरकारविरोधी आहे. हे अनेक मतदारसंघात फिरल्यानंतर आपल्याला समजले आहे, परंतु ईव्हीएम मशिन हॅक करून किंवा ईव्हीएम मशिनमध्ये गडबड केली जाऊ शकते, अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केली. पत्रकार परिषदेला माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, आपचे खासदार संजय सिंग, सीपीआयचे महेंद्र सिंग, पीसीसीचे (आयएनसी) व्हाईस प्रेसिडेंट शांती चौहान, तृणमूल काँग्रेसचे खासदार नजमुल हक, इंडियन युनियन मुस्लीम लीगचे खोरुम ओमर, आॅल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे जनरल सेक्रेटरी डॉ. जी. एच. फर्नांडिस, लोकतांत्रिक जनता दलाचे कपिल पाटील, डीएमकेचे खासदार टी. के. एस. इलानगोवल, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक आणि पक्षाचे सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.मॉक व्होटिंगमध्ये भाजपलाच मतेगोव्यात ईव्हीएम मशिनचे मॉक ड्रिल केले गेले. प्रत्येक पक्षाला ९-९ मते दिली गेली. मात्र, मतमोजणीचे बटन दाबले असता, भाजपला १७ मते मिळाल्याचे निदर्शनास आले, तर काँग्रेसला ९, आप पक्षाला ८ आणि अपक्षाला १ मते मिळाल्याची माहिती आपचे खा. संजय सिंग यांनी दिली.उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी टिष्ट्वट करून ३५० ईव्हीएम मशिन्समध्ये फेरफार केल्याचे निदर्शनास आणून दिले असल्याचे सांगतानाच निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधून बसला आहे, असा आरोप संजय सिंग यांनी केला.पवारांना बारामती बंदी : बारामती मतदारसंघातील प्रचाराची मुदत संपली. त्यानंतर शरद पवार यांनी येथील मतदार नसल्यामुळे मतदारसंघात राहू नये, अशी तक्रार भाजपने निवडणूक आयोगाकडे केली. माझे मतदान मुंबईमध्ये असले तरी माझे घर बारामती आहे. त्यामुळे मी थांबू शकत होतो. परंतु निवडणूक आयोगाने आम्हाला थांबू दिले नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक