शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

विरोधक राज्यात दंगलीची स्वप्न बघतायत, आंतरराष्ट्रीय फंडिंगने कट-कारस्थान; योगींचा विरोधकांवर हल्लाबोल

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 5, 2020 17:18 IST

आमचे विरोधक आंतरराष्‍ट्रीय फंडिंगच्या माध्यमाने जात आणि संप्रदायावर आधारीत दंगलींचा पाया घालून आमच्या विरोधात कट-कारस्थान आखत आहेत. (cm yogi adityanath, UP)

ठळक मुद्देभाजपाच्या कार्यकत्यांनी देशाच्या विकासासाठी स्वतःला समर्पित करावे - योगी आदित्यनाथगेल्या आठवडाभरापासून विरोधकांना राज्यात दंगली बघायच्या आहेत - योगी आदित्यनाथविरोधकांना उत्तर प्रदेशचा विकास पचवणे कठीण जात आहे - योगी आदित्यनाथ

लखनौ - विरोधकांना उत्तर प्रदेशचा विकास पचवणे कठीण जात आहे. यामुळे आता ते कट-कारस्थान करत आहेत, असे म्हणत, भाजपाच्या कार्यकत्यांनी देशाच्या विकासासाठी स्वतःला समर्पित करावे, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.

'आमचे विरोधक आंतरराष्‍ट्रीय फंडिंगच्या माध्यमाने जात आणि संप्रदायावर आधारीत दंगलींचा पाया घालून आमच्या विरोधात कट-कारस्थान आखत आहेत. गेल्या आठवडाभरापासून विरोधकांना राज्यात दंगली बघायच्या आहेत. मात्र, सर्व कटांवर मात करून आपल्याला पुढे जायचे आहे, असे योगींनी म्हटले आहे. 

तत्पूर्वी, संरक्षण संस्थांनी विरोधाआडून राज्यात जातीय दंगे घडवण्याचा आणि मुख्यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांची प्रतिमा मलीन करण्याचा मोठा कट रचला जात आसल्याचा खुलासा केल्याचे, सरकारकडून सांगण्यात आले होते. सरकारच्या म्हणण्या प्रमाणे, एका वेबसाईला इस्‍लामिक देशांकडून फंडिंग होत होते. एम्‍नेस्‍टी इंटरनॅशनल संस्‍थेशीही याचे संबंध असल्यासंदर्भात चौकशी सुरू आहे.

जनतेला चिथावण्यासाठी साईटचा वापर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण संस्थांनी http://justiceforhathrasvictim.carrd.co/ नावाच्या एका वेबसाईटला जाळ्यात घेतले आहे. या वेबसाईटवर पोलिसांच्या तावडीतून सुटण्याच्या आणि विरोध करण्यासंदर्भात माहिती दिली होती. एवढेच नाही, तर या वेबसाईटच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी निदर्शनात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले होते. या शिवाय, दंगल सुरू झाल्यानंतर आश्रू गॅसचे गोळे आणि अटकेपासून स्वत:चा बचाव कसा करावा, हेही या वेबसाईटवर सांगण्यात आले होते.

बनावट बातम्या सोशल मीडियावर व्हायरल - याप्रकरणी पोलिसांनी 3 ऑक्‍टोबरला आयपीसी आणि आयटी अॅक्‍टच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या साईटच्या माध्यमाने दिल्‍ली, कोलकाता, अहमदाबादसह देशाच्या विविध शहरांत निदर्शने करण्यासाठी आणि मार्च आयोजित करण्यासाठी चिथावणी दिली जात होती. काही वेळातच हजारो लोक फेक याडीने या वेबसाईटला कनेक्ट झाले होते. यानंतर  त्यांनी सोशल मीडियावर हाथरसशी संबंधित अफवा पोस्ट केल्या. मात्र, संरक्षण संस्था सक्रिय होताच ही बेब साईट बंद झाली. मात्र, त्यावरील माहिती संस्थांकडे सुरक्षित आहे. 

'इस्‍लामिक देशांकडून मिळायचे फंडिंग' -या वेबसाईटला इस्‍लामिक देशांकडून मोठ्या प्रमाणावर मदत मिळत होती. एम्‍नेस्‍टी इंटरनॅशनल संस्‍थेशीही या वेबसाईटचे संबंध असल्यासंदर्भात चौकशी सुरू आहे. एवढेच नाही, तर सीएए विरोधात सहभागी असलेल्या पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचा (एसडीपीआय)देखील ही वेबसाईट तयार करण्यात आणि ती चालवण्यात हात असल्याचा संशय आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाGang Rapeसामूहिक बलात्कार