शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा; अन्यथा..."

By कुणाल गवाणकर | Updated: January 13, 2021 18:51 IST

धनंजय मुडेंनी राजीनामा न दिल्यास रस्त्यावर उतरू; पाटील यांचा इशारा

मुंबई: गायिकेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहे. धनंजय मुंडेंनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा. ते राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा लोकांचा आवाज म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेले धनंजय मुंडे पोहोचले शरद पवारांच्या भेटीलागायिका रेणू शर्मानं धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत. तिनं केलेल्या आरोपांची चौकशी व्हायला हवी. त्यातून सत्य समोर येईल. मात्र त्याआधी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा. ते राजीनामा देण्यास तयार नसतील, तर सरकारचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून शरद पवारांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगायला हवं, असं पाटील म्हणाले.'धनंजय मुंडेंनी दुसऱ्या विवाहाची माहिती लपवली'; भाजप नेत्याची निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रारधनंजय मुंडेंनी संवेदनशीलपणे निर्णय घ्यायला हवा. अन्यथा लोकांचा आवाज म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू. धनंजय मुंडे यांच्या हातून चूक घडली आहे. माणसाच्या हातून चुका होत असतात. पण राजकारणाचे काही नियम आहेत. त्यात मुंडेंची चूक बसत नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला हवा. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अतिशय नैतिकपणे राजकारण करतात. आतापर्यंत त्यांनी शुद्ध राजकारण केलं आहे. त्यामुळे या प्रकरणात ते योग्य निर्णय घेतील, असं पाटील यांनी पुढे म्हटलं.धनंजय मुंडे प्रकरणी भाजपानं सोडलं मौन; “गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री राजीनामा देतील वाटत नाही,पण...”रेणू शर्मांनी केलेल्या आरोपांची चौकशी पोलीस करतील. त्यांच्या आरोपात तथ्य आढळल्यास मुंडेंना शिक्षा होईल आणि आरोप खोटे असल्यास शर्मांना शासन होईल. पण या प्रकरणी स्पष्टीकरण देत असताना मुंडेंनी दिलेल्या कबुलीजबाबाचं काय?, असा सवाल पाटील यांनी विचारला. 'रेणू शर्माची बहिण करुणा शर्मासोबत माझे संबंध होते. त्यातून मला दोन मुलं झाली. त्यांच्या शालेय कागदपत्रांवर माझं नाव आहे, अशी कबुली त्यांनी दिली. मात्र निवडणूक लढवताना दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी ही माहिती लपवली,' असं पाटील पत्रकारांना संबोधित करताना म्हणाले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेchandrakant patilचंद्रकांत पाटील