शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

'आप'च्या आरोपावर मुख्यमंत्री कार्यालयाचा खुलासा; सुधीर नाईक म्हणाले, "तो माझ्या कामाचा भाग..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 20:09 IST

सहकार विभागाच्या सुनावणीत अनुकुल निर्णय झाला, मात्र जेव्हा जेव्हा मालमत्ता हस्तांतरित करण्याची वेळ आली तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयातील ओएसडी सुधीर नाईक यांचे फोन जात असत.

ठळक मुद्देशेअर होल्डर्स फोरम आँफ भंडारी को.आँप बँक (नियोजित) या संघटनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटायला आले. मुख्यमंत्र्यांनी 'तपासून अहवाल सादर करावे' असा शेरा मारून ते सहकार विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठविले होते.मुख्यमंत्री  कार्यालयात येणारी शिष्टमंडळे आणि त्यांनी दिलेल्या निवेदनांचा पाठपुरावा करणे हा मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी म्हणून माझ्या कामाचा भाग आहे

मुंबई : दिवाळखोरीत निघालेल्या भंडारी सहकारी बँकेच्या मालमत्तेच्या लिलाव प्रक्रियेत मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी सुधीर नाईक आडकाठी आणत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने सोमवारी पत्रकार परिषदेत केला. तर सुधीर नाईक यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. आपला आणि या प्रकरणाचा काहीही संबंध नाही. मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी म्हणून आलेल्या निवेदनांचा पाठपुरावा केला. त्याच्या पलीकडे या विषयाशी माझा संबंध नसल्याचे नाईक यांनी म्हटले आहे. 

उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी भंडारी बँकेच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात आला. यापैकी नोव्हेंबर २०१९ मध्ये गोरेगाव पूर्वेतील अरिहंत अपार्टमेंटमधील ए टू एफ या एकत्रित जागेसाठी निविदा प्रक्रियेत साई डेटा फर्मच्या रश्मी उपाध्याय यांनी भाग घेतला. त्यात सर्व देय रक्कम भरूनही अद्याप ही मालमत्ता त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली नाही. सहकार विभागाच्या सुनावणीत अनुकुल निर्णय झाला, मात्र जेव्हा जेव्हा मालमत्ता हस्तांतरित करण्याची वेळ आली तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयातील ओएसडी सुधीर नाईक यांचे फोन जात असत. मुख्यमंत्र्यांनी यावर बंदी घातल्याचे सांगत आपल्या अधिकारांचा दुरूपयोग करत उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होण्यापासून रोखल्याचा आरोप आपच्या प्रीती शर्मा मेनन यांनी केला आहे.

सुधीर नाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा गैरवापर केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी.  लिलावातील लाभार्थ्यांना त्यांच्या खरेदी केलेल्या मालमत्ता ताब्यात द्याव्यात आणि या सबंध प्रक्रियेत उशीर झाल्यामुळे नुकसान भरपाई देखील देण्यात यावी. भंडारी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना दिले जाणारे पैसे लवकरात लवकर परतफेड करणे ही तातडीची आणि महत्त्वाची बाब असल्याचेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, या प्रकरणाशी माझा संबंध नसल्याचे सुधीर नाईक यांनी म्हटले आहे. शेअर होल्डर्स फोरम आँफ भंडारी को.आँप बँक (नियोजित) या संघटनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटायला आले. या शिष्टमंडळाने निवेदन दिले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी 'तपासून अहवाल सादर करावे' असा शेरा मारून ते सहकार विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठविले होते.

नंतरच्या काळात या शिष्टमंडळातील लोक जेंव्हा जेंव्हा भेटायला आले तेंव्हा आम्ही सहकार विभागाच्या सचिवांना त्याबाबत विचारायचो की, तुमचा अहवाल लवकर द्या, मुख्यमंत्र्यांनी मागितला आहे. या पलीकडे या प्रकरणाशी माझा संबंध नाही. यात निष्कारण माझे नाव घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री  कार्यालयात येणारी शिष्टमंडळे आणि त्यांनी दिलेल्या निवेदनांचा पाठपुरावा करणे हा मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी म्हणून माझ्या कामाचा भाग आहे. त्यामुळे तो पाठपुरावा घेतला, असे नाईक यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAam Admi partyआम आदमी पार्टी