शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

आम्ही भेटलो, पंतप्रधानांकडे जरा तुम्हीही पाठपुरावा करा; ओबीसींसाठी मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 12:38 IST

CM Uddhav Thackeray OBC Reservation issue: माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्यात पावसाळी अधिवेशनावरून राज्यपालांची भेट घेतली होती. यावर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले होते. या पत्राला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे.

राज्य सरकारला इतर मागास प्रवर्गाची काळजी आहे. यामुळेच आम्ही काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे उद्घविलेल्या परिस्थितीतून कायमस्वरुपी घटनात्मक मार्ग काढावा म्हणून विनंती केलीय. जरा तुम्हीही पाठपुरावा करावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat singh koshyari) यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. (CM Uddhav Thackeray appeals to Governor Bhagat singh koshyari over OBC reservation issue.)

...म्हणून पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचंच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून राज्यपालांच्या पत्राला उत्तर

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्यात पावसाळी अधिवेशनावरून राज्यपालांची भेट घेतली होती. यावर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले होते. या पत्राला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. या च पत्रात राज्यपालांना मराठा, इतर मागास आरक्षणावरून विनंती केली आहे.

इतर मागास प्रवर्ग आरक्षण प्रकरणी या प्रवर्गाच्या राजकीय प्रतिनिधीत्वासाठी मागासपणा निश्चित करण्याकरीता इम्पिरीकल डेटा आवश्यक आहे. हा डेटा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असून त्याची माहिती राज्य सरकारला मिळाल्यास आरक्षणासाठी अभ्यास करुन जरुर ती पुढील कार्यवाही करता येईल. याबाबत मोदींना कळविले आहे. तुम्हीही पाठपुरावा करून या समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती पत्रात केली आहे. 

विधानसभा अध्यक्ष निवड...भारतीय संविधानाच्या कलम १७८ तसेच महाराष्ट्र विधानसमा नियम, ६ अन्वये विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येते. तथापि, याकरीता विवक्षित कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जास्त काळ अधिवेशन घेता येणे शक्य झाले नाही. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील बहुतांश राज्यातही अल्प कालावधीची अधिवेशने घेण्यात आलेली आहेत. त्यामुळे राज्यात अध्यक्षांची निवडणूक घेता आलेली नाही. या परिस्थितीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडेच अध्यक्षपदाचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनही त्यांच्याच अध्यक्षतेखाली पार पडले आहे. यामुळे निवडणुकीअभावी कोणत्याही सांविधानिक तरतूदीचा भंग झालेला नाही अथवा घटनात्मक अडचण निर्माण झालेली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीOBC Reservationओबीसी आरक्षणNarendra Modiनरेंद्र मोदी