शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतीतले काही कळत नाही; चंद्रकांत पाटील यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 06:54 IST

BJP Chandrakant Patil, CM Uddhav Thackeray News: ट्रॅक्टर यात्रा काढून कृषी कायद्यांचे जल्लोषात स्वागत

पुणे : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फक्त खुर्ची महत्त्वाची आहे. त्यांना शेतीमधले काहीही कळत नाही. शेतकऱ्यांच्या हिताचे काहीही पडलेले नाही. मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांचे स्वागत राज्यभर होत असताना हे सरकार शेतकरी हिताच्या आड येत असून आंधळे, बहिरे झाले आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केली.

दौंड तालुक्यातील वरवंड ते चौफुला अशी ट्रॅक्टर यात्रा काढून या तीन कृषी कायद्याचे स्वागत करण्यात आले. भाजपा किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष डॉ.अनिल बोंडे, आमदार सुजितसिंह ठाकुर, आमदार राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी यावेळी उपस्थित होते.पाटील म्हणाले, राहुल गांधींनी ट्रॅक्टर जाळून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. त्यांना शेती म्हणजे काय हेच समजत नाही. काहीं दिवसांपूर्वी या कायद्याला पाठिंबा देणाºयांना दिल्लीवरुन मॅडमचा रेटा आल्याने केवळ खुर्ची टिकवण्यासाठी कायद्याला स्थगिती दिली गेली. परंतु केंद्राचा कायदा श्रेष्ठ ठरत असतो. कायद्याला स्थगिती देता येत नाही. मुळातच ठाकरेंना कायदा कळतो का, हा प्रश्न आहे. ते या कायद्याला स्थगिता का देत आहेत? सेस गोळा करणे बापाची पेंड आहे काय, असा सवाल करून पाटील म्हणाले, कृषि उत्पन बाजार समितीला केवळ सेस गोळा करण्याचे काम आहे. सेस बंद होणार असल्यानेच यांच्या पोटात दुखत आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरे