शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

आंध्रातील वायएसआर काँग्रेस नेत्यांच्या आरोपांची होणार सीबीआय चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 23:37 IST

उच्च न्यायालय : न्यायाधीश, न्यायपालिकेवर समाजमाध्यमांतून आक्षेपार्ह भाष्यांचे प्रकरण

अमरावती (आंध्र प्रदेश) : काही न्यायाधीश आणि न्यायपालिकेवर समाजमाध्यमांतून सत्ताधारी वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या भाष्यांची केंद्रीय गुप्तचर खात्याकडून (सीबीआय) चौकशी करण्याचे आदेश आंध्र प्रदेशउच्च न्यायालयाने सोमवारी दिले.

तत्पूर्वी, राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) याबाबत केलेल्या चौकशीवर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती राकेश कुमार आणि जे. उमा देवी यांच्या खंडपीठाने सीबीआयला गुन्हा नोंदवून अहवाल आठ आठवड्यांत सादर करण्यास सांगितले.सुनावणीदरम्यान न्यायालयाने सीआयडीने केलेल्या तपासावर नाराजी व्यक्त करून म्हटले की, वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांना वाचवण्यासाठीच त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाहीत. राज्य सरकारने सीबीआयला तपासात सहकार्य करावे, असेही आदेश खंडपीठाने दिले. काही न्यायाधीश आणि न्यायपालिकेवर काही निकालानंतर समाजमाध्यमांत बदनामीकारक अनेक भाष्ये केली गेल्यानंतर उच्च न्यायालयाने स्वत:हून त्यांची दखल घेतली. हायकोर्टाच्या निर्देशांनंतर त्याच्या महानिबंधकांनी सीआयडीकडे नावे आणि पुराव्यांसह तक्रार दाखल केली; परंतु राज्याच्या पोलिसांनी फक्त नऊ जणांवरच गुन्हा दाखल केला होता.काय आहे प्रकरण?न्यायाधीश आणि तेलगू देसम पक्षादरम्यान संगनमत असल्याचा आरोप मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टाचे एक वरिष्ठ न्यायाधीश तेलगू देसम पक्षाच्या हितासाठी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या सुनावणीवर प्रभाव टाकत आहेत, असा गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांना लिहिलेल्या पत्रात असा आरोप केला आहे की, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा वापर लोकशाहीमार्गाने निवडून आलेले माझे सरकार पाडण्यासाठी केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका वरिष्ठ न्यायाधीशांचे चंद्राबाबू नायडू यांच्याशी जवळीक आहे.नायडू यांच्या कामांबाबत चौकशीनंतर न्यायाधीशांनी न्यायिक प्रशासनावर प्रभाव टाकणे सुरू केले. हायकोर्टातील काही न्यायाधीशांचे सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश अणि तेलगू देसमशी संगमनत असल्याचा आरोपही केला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAndhra Pradeshआंध्र प्रदेश