शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत बैलगाड्यांची शर्यत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 06:19 IST

harad Pawar : पवार आरक्षणासह अन्य विषयावर भाष्य करत असताना बैलगाडा शर्यतीसाठी सुरू असलेल्या या ऑनलाइन प्रतिक्रियांचा जोरदार मारा सुरू होता. त्यामुळे काही प्रेक्षक बुचकाळ्यात पडले होते.

- गौरीशंकर घाळे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी आरक्षण मर्यादा आणि राज्यसभेतील गदारोळाच्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली. नेहमीप्रमाणे राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया पेजवरून या परिषदेचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले. परंतु, या प्रक्षेपणात ‘’बैलगाडा शर्यत’’ सुरू करण्याची मागणी करत नेटकऱ्यांनी अक्षरशः प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. पवार आरक्षणासह अन्य विषयावर भाष्य करत असताना बैलगाडा शर्यतीसाठी सुरू असलेल्या या ऑनलाइन प्रतिक्रियांचा जोरदार मारा सुरू होता. त्यामुळे काही प्रेक्षक बुचकाळ्यात पडले होते. त्यातील काहींनी हा काय प्रकार आहे, अशी विचारणाही केली. राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याची मागणीने सध्या जोर धरला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील, शेतकी पार्श्वभूमी असलेले लोक सोशल मीडियात हा विषय मांडत आहेत. अनेक नेत्यांच्या पोस्टवर शर्यत सुरू करण्याची मागणी करणारे पोस्ट केले जात आहेत. या मागणीला राजकीय रंगही चढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे, भाजप आमदार गोपीचंद पडळकर या नेत्यांनी बैलगाडा शर्यत सुरू करण्याची जाहीर मागणीही केली आहे. तर, पंधरा दिवसांत शर्यत सुरू करण्याचा निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही काही गावकऱ्यांनी दिला आहे. सोशल मीडियावर बैलगाडा शर्यतीची मागणी लावून धरणारे विविध पेजही सुरू करण्यात आले आहेत. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हा विषय जिव्हाळ्याचा बनत असल्याचे चित्र आहे.

सोशल मीडियावर केलेल्या मागण्या‘साहेब, बैलगाडा शर्यत सुरू करा, शर्यत सुरू नाही झाली तर पाच वर्षांत खिलार जात संपून जाईल’, पेटावर बंदी आणा, बाहेरच्या देशातील पेटा नावाची संस्था आपल्यावर राज्य करत आहे, बैलगाडा शर्यत ही आपली ग्रामीण संस्कृती आहे, शर्यतीला ४०० वर्षांचा इतिहास आहे, शर्यतीवरील बंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे, जंगली प्राण्यांच्या यादीतून बैलाला वगळा, देशी गोवंशाच्या जतन-संवर्धनासाठी शर्यत सुरू झालीच पाहिजे, आपणच शेतकऱ्यांचे वाली आहात-शर्यत सुरू करायला लावा, पेटा हलवा-बैल वाचवा, साहेबांनी लक्षं घातल्यास आठ दिवसात बंदी उठेल... असे शेकड्याने प्रतिक्रिया येऊ लागल्या.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण