शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
4
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
5
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
6
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
7
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
8
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
9
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
10
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
11
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
12
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
13
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
14
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
15
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
16
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
18
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
19
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
20
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

Budget 2021 : सामाजिक, आर्थिक न्यायासाठी अर्थचक्र गतिमान करणारा क्रांतिकारी अर्थसंकल्प - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 17:40 IST

Budget 2021 Latest News and updates, Ramdas Athawale : सर्व समाज घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प देशाला दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन रामदास आठवले यांनी केले आहे.

 मुंबई : केंद्र सरकारने सन 2021 - 22 चा सादर केलेला अर्थसंकल्प हा कृषीक्षेत्राला नवसंजीवनी देणारा, मजूर कामगार गरिबांना आर्थिक न्याय देणारा, सामाजिक आणि आर्थिक समतेकडे भारताचे अर्थचक्र अग्रेसित करणारा क्रांतिकारी अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले दिली. तसेच, सर्व समाज घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प देशाला दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन रामदास आठवले यांनी केले आहे. (Budget 2021 Latest News and updates)

यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकरी, मजूर, कामगार, दलित, अल्पसंख्यांक अशा सर्व समाज घटकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्याच्या महत्वपूर्ण विचारांचे सूत्र प्रकर्षाने दिसत आहे. कोरोना सारख्या महामारीच्या काळात सर्वांचा जीव वाचविण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय झाला. जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असणारा मोठा आपला देश आहे. या प्रचंड लोकसंख्येचा जीव कोरोनाच्या संकटात होता. त्या सर्वांना जीवदान देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी झाले, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

याचबरोबर, आता यंदाच्या क्रांतिकारी अर्थसंकल्पातून  सर्व समाज घटकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना आणि मजुरांना कामगारांना तर या  अर्थसंकल्पातून नवसंजीवनी देण्यात आली आहे. दूरदृष्टी असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सामान्य गरीब आणि दलित मागासवर्गीय वर्गाचे होत लक्षात घेऊन अत्यंत चांगला आणि आर्थिक बळ देणारा, आत्मनिर्भर करणारा अर्थसंकल्प सादर केला आहे, असे सांगत रामदास आठवले यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. 

दरम्यान, आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही.  75 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या आणि ज्यांना निवृत्तीवेतन मिळते त्यांचा कर माफ करण्यात आला आहे. तसेच, भारत पेट्रोलियम, आयडीबीआय बँक आणि एअर इंडिया यामध्ये निर्गंतवणूक करण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली.   

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNarendra Modiनरेंद्र मोदीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनbudget 2021बजेट 2021