शहरं
Join us  
Trending Stories
1
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
4
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
5
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
6
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
7
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
8
"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन
9
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
10
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
11
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
13
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
14
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
15
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
16
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
17
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
18
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
19
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
20
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार

केजरीवालांवर भाजपाचा 'सर्जिकल स्ट्राईक'; पाकिस्तान हल्ल्याच्या वक्तव्यावर संबित पात्रा भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 9:51 PM

Bjp attack on Arvind Kejriwal's statement: जर पाकिस्तानने हल्ला केला तर तुम्ही राज्यांवर याची जबाबदारी सोडणार आहात का? उत्तर प्रदेश स्वत:चे रणगाडे खरेदी करणार आहे का की दिल्ली स्वत:ची हत्यारे खरेदी करणार आहे? असे केजरीवाल म्हणाले होते. 

कोरोना लसीवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर जहरी टीका केली आहे. यावर भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) भडकले असून त्यांनी सर्जिकल स्ट्राईकवर बोट दाखवणाऱ्या केजरीवालांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. (BJP got Angry on Arvind kejariwal's pak attack statement. remembering surgical strike statements.)

लसीच्या बाबतीत केंद्र सरकारने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करून गेल्या चार दिवसांपासून 18 ते 44 वयाच्या नागरिकांचे लसीकरण बंद आहे. हे एकट्या दिल्लीतच नाही तर देशभरातील चित्र आहे. नवीन लसीकरण केंद्रे सुरु करण्यापेक्षा आम्हाला आहेत तीच बंद करावी लागत आहेत, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी केंद्र सरकारवर केली. केंद्र का खरेदी करत नाहीय? लसींची खरेदी आपण राज्यांवर सोडू शकत नाही. आपला देश कोरोनाविरोधात युद्ध लढत आहे. जर पाकिस्तानने हल्ला केला तर तुम्ही राज्यांवर याची जबाबदारी सोडणार आहात का? उत्तर प्रदेश स्वत:चे रणगाडे खरेदी करणार आहे का की दिल्ली स्वत:ची हत्यारे खरेदी करणार आहे? असे केजरीवाल म्हणाले होते. 

संबित पात्रा काय म्हणाले?दिल्लीमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत, ही आनंदाची बाब आहे. मात्र, दु:खद म्हणजे केजरीवालांचे राजकारण सुरु आहे. आम्ही केजरीवालांना आज टीव्हीवर दोनदा पाहिले, त्यांचा उद्देश फक्त प्रचार करण्याचा होता. केंद्र सरकारकडून गेल्या 130 दिवसांत सर्व राज्यांना 20 कोटी कोरोना लसी पुरविल्या गेल्या आहेत. दिल्ली सरकारकडे आता 1.5 लाख लसी उपलब्ध आहेत. नियोजन आणि वितरण करणे दिल्ली सरकारचे काम आहे, पण केजरीवाल राजकारण करत आहेत, असे पात्रा म्हणाले. 

तुम्ही विचारलात की दिल्ली, उत्तर प्रदेश युद्धावेळी वेगवेगळी हत्यारे आणि दारुगोळा घेऊन लढणार का? परंतू आम्ही जेव्हा सर्जिकल स्ट्राईकवेळी एकत्र होऊन लढलो, तर तुम्हीच त्यावर प्रश्न उपस्थित करता, केजरीवालांनी यावर माफी मागायला हवी, अशी मागणी पात्रा यांनी केली. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाCorona vaccineकोरोनाची लसPakistanपाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक