नवी दिल्ली : नुकत्याच केलेल्या दिल्लीच्या दौऱ्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री व तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची फारसा गाजावाजा न करता भेट घेतली होती. एनडीएला अकाली दल, शिवसेना, तेलुगू देसम पक्ष अशा घटक पक्षांनी या आधीच रामराम ठोकला असल्याने, केसीआर, जगनमोहन रेड्डी यांच्याशी भाजप जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. केसीआर हे १० डिसेंबरपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आले होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व अन्य केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली.
केसीआर, जगनमोहन रेड्डी यांच्याशी भाजपाची जवळीक, राजकीय निरीक्षकांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 04:56 IST