शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

‘अली’च्याच काय, ‘बजरंग बली’च्याही मतांचा भाजप हक्कदार नाही; मायावती यांचा टोला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 03:39 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पक्षाला ‘अली’चेच काय, नाहीच, ‘बजरंग बली’चेही मत मिळणार नाही.

बदायूं : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पक्षाला ‘अली’चेच काय, नाहीच, ‘बजरंग बली’चेही मत मिळणार नाही. या निवडणुकीत ‘नमो नमो’ असा जप करणारे जाणार आणि ‘जय भीम’चा जयघोष करणारे सत्तेत येणार. आमची या देशाला सध्या खूप गरज आहे, असे बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी शनिवारी येथील जाहीर सभेत सांगितले.महाआघाडीचे उमेदवार, समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव यांच्या प्रचारार्थ बदायूं येथे सभा झाली. त्या म्हणाल्या, ‘लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश मधून योगी यांच्या पक्षाला ‘अली’ चे मत मिळणार नाही, आणि माझ्या जातीशी संबंधित असलेल्या बजरंग बलीचेही मतदान होणार नाही.निवडणुकीशी संबंधित काही महत्त्वाच्या बाबी जनतेसमोर ठेवणार असल्याचे सांगत मायावती यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वक्तव्याबद्दल निशाणा साधला. ‘त्यांचे अली असतील, तर आमचे बजरंग बली आहेत’ असे योगी म्हणाले होते. मायावती म्हणाल्या, ‘त्यांना मी उत्तर देऊ इच्छिते. आमचे ‘अली’सुद्धा आहेत व ‘बजरंग बली’सुद्धा आहेत. आमच्यासाठी दोघेही आमचे आपले आहेत. आम्हाला कोणीही परके नाही, आम्हाला ‘अली’ही हवेत आणि ‘बजरंग बली’ही हवेत.

खास करून आम्हाला ‘बजरंग बली’ यासाठी हवेत की, ते माझ्या स्वत:च्या दलित जातीचे आहेत. ‘बजरंग बली’ यांच्या जातीचा शोध मी नव्हे, स्वत: योगी आदित्यनाथ यांनी लावला आहे. ‘बजरंग बली’ वनवासी आणि दलित जातीचे असल्याचे योगी यांनी स्वत:च जनतेला सांगितले आहे. आमच्याकडे ‘अली’सुद्धा आहेत आणि ‘बजरंग बली’सुद्धा आहेत, ही खूप आनंदाची बाब आहे. या दोघांच्या जोडीमुळे आम्हाला या निवडणुकीत खूप चांगला लाभ होणार आहे.
>कशावरून उद्भवला वादमायावती यांनी काही दिवसांपूर्वी सहारनपूर येथील देवबंद मध्ये मुस्लिमांनी एकजूट दाखवित महाआघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले होते. नंतर योगी यांनी मेरठ मध्ये एका सभेत ‘सपा-बसपा’आघाडीवर तीर साधला. त्यांची ‘अली’वर श्रध्दा असेल तर आमचा ‘बजरंगबली’वर विश्वास आहे, असे उदगार काढले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019mayawatiमायावतीbadaun-pcबादाण