शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी पक्षाच्या ‘त्या’ नेत्याविरोधात अत्याचाराचा आरोप; भाजपा केंद्रीय महिला आयोगाकडे दाद मागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 14:46 IST

भाजपा महाराष्ट्र महिला आघाडी आता केंद्रीय महिला आयोगाला पत्र लिहून या प्रकरणाची दखल घेण्यास सांगणार आहे असल्याचं पाटील यांनी नाव न घेता इशारा दिला आहे. 

ठळक मुद्देसत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याविरोधात एका महिलेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. मी एक शिक्षित, सक्षम भारतीय महिला आहे. मला सहानुभूती नको तर न्याय हवा.सत्ताधारी पक्षाचा ‘तो’ नेता मागील ८ वर्षापासून पोलीस आणि सिस्टमचा दुरूपयोग करून मला शिवीगाळ करत आहेत

मुंबई – सत्ताधारी पक्षाचे नेत्याविरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या नेत्यावर एका महिलेने अत्याचाराचे आरोप केले आहेत. या महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही पत्र पाठवलं आहे. त्या प्रकरणी भाजपा महाराष्ट्रची महिला आघाडी केंद्रीय महिला आयोगाकडे दाद मागणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, जे गेली २ वर्ष रोज सकाळी उठून महाराष्ट्राच्या राजकीय जीवनाला दिशा देतात. त्यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचा आरोप केला आहे. महाराष्ट्रात महिला आयोगाला गेली दीड वर्ष झाली तरी अध्यक्षच नाही. म्हणून यासंदर्भात भाजपा महाराष्ट्र महिला आघाडी आता केंद्रीय महिला आयोगाला पत्र लिहून या प्रकरणाची दखल घेण्यास सांगणार आहे असल्याचं पाटील यांनी नाव न घेता इशारा दिला आहे. 

काय आहे हे प्रकरण?

सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याविरोधात महिलेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. माझी हत्या करण्यापूर्वी मला न्याय द्या अशी विनवणी या महिलेने पत्रात केली आहे. हे पत्र संबंधित महिलेने ट्विटरवर पोस्ट केले आहे. या महिलेने पत्रात लिहिलं आहे की, मी एक शिक्षित, सक्षम भारतीय महिला आहे. मला सहानुभूती नको तर न्याय हवा. देशातील महिला वास्तविक सुरक्षित आहेत का? सत्ताधारी पक्षाचा ‘तो’ नेता मागील ८ वर्षापासून पोलीस आणि सिस्टमचा दुरूपयोग करून मला शिवीगाळ करत आहेत. मला, माझ्या कुटुंबीयांना आणि नातेवाईक, मित्रपरिवाराला वेगवेगळ्या कारणानं त्रास देत आहेत. प्रत्येक वेळी विविध गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधिकारी मला विविध पोलीस स्टेशनला बोलावतात. माझं चारित्र्यहनन आणि त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत असं या महिलेने पत्रात लिहिलं आहे.

तसेच ही गोष्ट मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना सांगितल्यानंतरही माझा छळ थांबला नाही. मी वैयक्तिक सुप्रिया सुळे, सुभाष देसाई, नीलम गोऱ्हे यांना समस्या सांगितली पण मदत मिळाली नाही. मात्र या लोकांना समस्या सांगितल्यानंतर आणखी त्रास वाढला हे सत्य आहे असं त्या महिलेने म्हटलं आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा