शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

"भाषणात हिंदुत्व कायम आहेच म्हणायचं आणि निभवायची वेळ आली की…" भाजपाने मुख्यमंत्र्यांना पुन्हा डिवचले

By बाळकृष्ण परब | Published: March 04, 2021 10:17 AM

BJP Criticize Uddhav Thackeray : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी शिवसेना आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे. त्यादरम्यान...

मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये (BJP) चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आदी भाजपाच्या नेत्यांनी घणाघाती टीका करत सरकारची कोंडी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही (Uddhav Thackeray) या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच शिवसेनेचं हिंदुत्व (Hindutwa) कायम असल्याचाही पुनरुच्चार केला. मात्र आता या मुद्य्यावरून भाजपाने शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे. (BJP Spokesperson Keshav Upadhye Criticize CM Uddhav Thackeray on issue Of Hindutwa  )

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत आमचे हिंदुत्व कायम आहेच, म्हणणारे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष केले आहे. या ट्विटमध्ये उपाध्ये म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदुत्व कायम आहेच असं भाषणात म्हणतात. मात्र ते निभावण्याची वेळ आली की, राम मंदिर समर्पण निधीवर टीका करतात. सावरकरांना आदरांजली वाहणे दूर राहिले. सत्तेसाठी सावरकरांवर गलिच्छ आरोप करणाऱ्या काँग्रेससोबत आघाडी करतात, असा टोला उपाध्ये यांनी लगावला. 

याबाबत केलेल्या अजून एका ट्विटमध्ये उपाध्ये म्हणाले की, शिवसेना संभाजीनगर नामकरणाच्या केवळ गप्पा मारतेय. कारण औरंगाबादच्या नामांतरास काँग्रेस, राष्ट्रवादीचा विरोध आहे. हिंदू सडा हुवा है म्हणणाऱ्या शरजिला राज्यात मोकळे रान दिले जाते. मात्र शिवजयंती साजरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात, अशी टीकाही केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंच्या कारभारावर केली.  

दरम्यान, काल राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. बाबरी मशीद पडली तेव्हा येरे गबाळे पळून गेले. आता राममंदिरासाठी पैसे गोळा करता? फिरत आहेत. कोरोना काळात चांगले काम केले असताना महाराष्ट्राची बिहारसोबत तुलना का करता? आमच्यावर जरूर टीका करा; पण, महाराष्ट्राची बदनामी करू नका. खोटं बोलून लाट येते, सत्ता मिळते, पण ती टिकत नाही, हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी विधानसभेत भाजपवर जोरदार हल्ला चढविला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी हिंदुत्व, राममंदिर, इंधन दरवाढ, शेतकरी आंदोलन अशा विविध मुद्द्यांना स्पर्श करत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्याचा परामर्श घेत ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाHindutvaहिंदुत्वBJPभाजपाPoliticsराजकारण