शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

होळकरांचा वाडा इतके दिवस फुकट वापरलात, मग आता...; पडळकरांचा पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 22:23 IST

वाफगाव किल्ल्याच्या संवर्धनावरून गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांवर नाव न घेता निशाणा

पुणे: वाफगाव किल्ल्यातील शाळा दुसरीकडे हलवून किल्ल्याच्या संवर्धनासाठी पन्नास कोटी देण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. समस्त धनगरांची, बहुजन समाजाची आस्था या किल्ल्यात आहे. त्यामुळे या प्रश्नावर राजकारण नको, असं पडळकर म्हणाले. पत्रकारांशी संवाद साधताना पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. होळकरांचा वाडा इतके दिवस फुकट वापरला, आता किल्ल्याच्या संवर्धनासाठी ५० कोटी द्या, असं पडळकर म्हणाले.वाफगाव किल्ल्याला संवर्धित वास्तूचा दर्जा देण्याची मागणी पडळकर यांनी केली. वाफगाव किल्ल्याचं संवर्धन, जतन व्हायला हवं. त्यामुळेच या किल्ल्यासंदर्भात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी निर्णय घ्यावा. ही संस्था सरकारच्या ताब्यात द्यावी किंवा होळकरांच्या ताब्यात द्यावी. जे योग्य असेल ते करावं. या वास्तूला संवर्धित वास्तूचा दर्जा देऊन ५० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारनं त्वरित द्यायला हवा, अशी मागणी पडळकर यांनी केली. होळकर यांनी रयत शिक्षण संस्थेला १९५५ मध्ये ही वास्तू दिली. कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिक्षणाबद्दलची दूरदृष्टी यामागे होती. गावगाड्यातल्या सर्वसामान्य मुलांना शिक्षण मिळावं या भावनेपोटी ही वास्तू रयत शिक्षण संस्थेला दिलेली आहे. आज संस्था खूप मोठी झाली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था आहे. भाऊराव पाटील यांचा शिक्षणाबद्दलचा हेतू स्वच्छ होता. मात्र त्या हेतूपासून आज ही संस्था दूर गेल्यासारखी वाटते. नुकताच या संस्थेतील मोठा भ्रष्टाचारदेखील समोर आला आहे, असं पडळकर म्हणाले.आम्ही शिक्षणाच्या विरोधात नाही. हे शिक्षणाचं, विद्येचं मंदिर आहे. याच वास्तूत ६५ वर्षे विद्या मंदिर चाललं. आता ही इमारत पडझडीच्या परिस्थितीत आहे. इथल्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना धोका होऊ शकतो. म्हणून संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी तत्काळ निर्णय घ्यावा. याशिवाय सरकारनं वास्तूच्या संवर्धनासाठी ५० कोटींचा निधी द्यावा. मल्हारराव होळकरांनी वाफगावसारखे सहा भुईकोट किल्ले उभारले. त्यापैकी हा एकच किल्ला आता उरलेला आहे आणि त्याची ही पडझड झाली आहे. त्यामुळे किल्ल्याची डागडुजी गरजेची आहे. तरच इतिहास जपला जाईल, असं पडळकर यांनी म्हटलं.

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरSharad Pawarशरद पवार