शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अब की बार एनडीए की सरकार? भाजपाची मित्रपक्षांना साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 09:47 IST

भाजपा नेते राम माधवांचं सूचक विधान

नवी दिल्ली: यंदा भाजपाला गेल्या निवडणुकीप्रमाणे संपूर्ण बहुमत मिळणार नाही, असे संकेत भाजपाचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी दिले आहेत. यंदा केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील सत्ता स्थापन करण्यासाठी मित्रपक्षांची गरज भासू शकते, असं माधव म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं. आम्हाला 271 जागा मिळाल्या, तर आनंदच आहे. अन्यथा मित्रपक्षांच्या सोबतीनं आम्ही अगदी आरामात सरकार स्थापन करू, असं राम माधव म्हणाले. उत्तरेकडच्या राज्यांमध्ये पक्षाला नुकसान झाल्यास, त्याची भरपाई ईशान्य, पूर्वेतल्या राज्यांमधून आणि पश्चिम बंगाल, ओडिशात होऊ शकते, असं म्हणत राम माधव यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला उत्तर प्रदेशात नुकसान होऊ शकतं, अशी शक्यता वर्तवली. पूर्व भारतात आम्ही अतिशय उत्तमपणे प्रचार केला. तसाच प्रचार आम्ही दक्षिणेत केला असता, तर आम्ही आणखी चांगल्या परिस्थितीत असतो, अशा शब्दांत त्यांनी भाजपाच्या कामगिरीचं विश्लेषण केलं. यंदाच्या निवडणूक निकालावर भाष्य करताना माधव यांनी भाजपाला फटका बसू शकतो, याची अप्रत्यक्ष कबुली दिली. गेल्या निवडणुकीवेळी सरकारच्या विरोधात वातावरण होतं. त्यामुळे आम्हाला मोठं यश मिळालं. त्यामुळे यंदा त्या निकालाची पुनरावृत्ती होईलच असं नाही, असं माधव म्हणाले. राम माधव भाजपाचे प्रमुख नेते असून पक्षाच्या रणनितीकारांमध्ये त्यांचा समावेश होतो. संघाची पार्श्वभूमी असलेल्या माधव यांनी जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीसोबत सत्ता स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय ईशान्य भारतात पक्षाचा विस्तार करण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. भाजपा सत्तेत आल्यानंतर ईशान्य भारतात भाजपाचा दबदबा वाढला आहे. यात माधव यांची महत्त्वाची भूमिका आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा