शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

"नाईट लाईफच्या नावाखाली पेंग्विन मुंबईची वाट लावतोय", कोरोना वाढत असताना पबमधील पार्ट्यांवरून घणाघाती आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 12:14 IST

Night life in Mumbai : आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीमधील एका पबमध्ये सुरू असलेल्या पार्टीचा व्हिडीओ शेअर करत आज मनसेने मुंबईमध्ये कोरोनाच्या नियमावलीला हरताळ फासला जात असल्याचे समोर आणले होते.

ठळक मुद्देआदित्य ठाकरे जिथून निवडून आले आहेत. त्या वरळी भागात पब, दारू आणि धिंगाणा जोरात सुरू आहेमुख्यमंत्र्यांना स्वतःच्या मुलाच्या मतदारसंघात कोरोना दिसत नाहीनाईट लाईफच्या नावाखाली पेंग्विन मुंबईची वाट लावतोय तर दुसऱ्या बाजूला ह्यांचेच मित्र हे क्लब चालवतात

मुंबई - एकीकडे राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीमधील एका पबमध्ये सुरू असलेल्या पार्टीचा व्हिडीओ (night life in Mumbai) शेअर करत आज मनसेने (MNS) मुंबईमध्ये कोरोनाच्या नियमावलीला हरताळ फासला जात असल्याचे समोर आणले होते. त्यानंतर भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. (BJP Leader Nilesh Rane Criticize Aditya Thackeray for night life in Mumbai )

आदित्य ठाकरेंवर टीका करताना केलेल्या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की, आदित्य ठाकरे जिथून निवडून आले आहेत. त्या वरळी भागात पब, दारू आणि धिंगाणा जोरात सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या मुलाच्या मतदारसंघात कोरोना दिसत नाही. नाईट लाईफच्या नावाखाली पेंग्विन मुंबईची वाट लावतोय तर दुसऱ्या बाजूला ह्यांचेच मित्र हे क्लब चालवतात, असा घणाघाती आरोप निलेश राणे यांनी केला आहे. 

दरम्यान, मनसेचे नेते संतोष धुरींनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. वरळीतील पबमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन सुरू असल्याचा प्रकार त्यांनी समोर आणला आहे. या माध्यमातून धुरींनी शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंवर (Shiv Sena Leader Aditya Thackeray) निशाणा साधला आहे. 'मुख्यमंत्री ठाकरे पत्रकार परिषदेत कोरोना संपला नसल्याचं सांगतात. पण वरळीतल्या कमला मिलमध्ये १२ वाजून गेल्यानंतरही पब सुरू आहे. इतर ठिकाणी ११ वाजता पब बंद होतात. मग वरळीतले पब रात्रीचे १२-१ पर्यंत कसे काय सुरू असतात. यांना कोण परवानगी देतं?', असा सवाल धुरींनी उपस्थित केला.मनसेचे नेते संतोष धुरींनी कमला मिल कंपाऊंडमधल्या युनियन पबमधून फेसबुक लाईव्ह केलं. पबमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं व्हिडीओत दिसत होतं. पबमध्ये कोणतंही सोशल डिस्टन्सिंग नव्हतं. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते. यावरून धुरींनी मंत्री आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं. 'आदित्य ठाकरेंच्या मतदासंघात सर्व नियम धाब्यावर बसवले जातात आणि मुख्यमंत्री सर्वसामान्यांना कोरोना गेलेला नसल्याचं सांगतात. सामान्य लोकांसाठी कोरोना आहे. पण श्रीमंतांसाठी कोरोना नाही. युवराज आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील ही परिस्थिती आहे,' असं धुरी म्हणाले होते.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेNilesh Raneनिलेश राणे MumbaiमुंबईPoliticsराजकारण