राजा 'उधार' झाला अन् हाती भोपळा दिला; शेतकरी प्रश्नावरून फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

By कुणाल गवाणकर | Published: December 25, 2020 12:38 PM2020-12-25T12:38:18+5:302020-12-25T14:33:58+5:30

शेतकरी संवाद यात्रेदरम्यान देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर जोरदार टीका

bjp leader devendra fadnavis slams cm uddhav thackeray over help to farmers | राजा 'उधार' झाला अन् हाती भोपळा दिला; शेतकरी प्रश्नावरून फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

राजा 'उधार' झाला अन् हाती भोपळा दिला; शेतकरी प्रश्नावरून फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Next

पुणे: राजा उधार झाला आणि हाती भोपळा दिला, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी प्रश्नावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज्यातील शेतकरी संकटात असताना राज्य सरकार कोणतीही मदत दिली नाही. शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं, अशी टीका फडणवीस यांनी केली. ते शेतकरी संवाद यात्रेदरम्यान पुण्यात बोलत होते.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात मदत दिली जात आहे. मात्र राज्य सरकार पीक विमा कंपनीदेखील अपॉईंट करू शकलं नाही. त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसेच मिळाले नाहीत. राज्यात भाजपचं सरकार असताना चार वर्ष प्रधानमंत्री पीक विमा योजना व्यवस्थित राबवण्यात आली. त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला. मात्र आता सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम करत आहे, अशा शब्दांत फडणवीसांनी शरसंधान साधलं.

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांनी बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावादेखील घेतला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार तर मुख्यमंत्र्यांच्याही पुढे गेले. त्यांनी बागायतदारांना दीड लाख रुपयांची मदत देऊ असं म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. राजा उधार झाला आणि हाती भोपळा दिला, अशी राज्यातील परिस्थिती आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

ठाकरे सरकारच्या कर्जमाफीवरदेखील फडणवीस यांनी जोरदार टीका केली. 'आम्ही केलेल्या कर्जमाफीला नाव ठेवत महाविकास आघाडी सरकारनं कर्जमाफीची योजना तयार केली. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आम्ही केलेल्या कर्जमाफीचा लाभ ४२ लाख शेतकऱ्यांना झाला होता. मात्र यांची कर्जमाफी २९ लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली. आम्ही प्रामाणिक शेतकऱ्यांना इन्सेंटिव्ह दिला होता. यांनी मात्र प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ठेंगा दाखवला,' अशा शब्दांत विरोधी पक्षनेत्यांनी सरकारचा समाचार घेतला.
 

 

Web Title: bjp leader devendra fadnavis slams cm uddhav thackeray over help to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.