शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

...तेव्हा आम्ही राज्यात सरकार देऊ; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'वेळ'

By कुणाल गवाणकर | Updated: November 11, 2020 18:50 IST

बिहारमधील विजयात पंतप्रधान मोदींचा मोलाचा वाटा; फडणवीस यांच्याकडून पंतप्रधानांचं कौतुक

मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं आहे. अतिशय चुरशीच्या लढतीनंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं (एनडीए) बिहारमध्ये सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलापेक्षा (जेडीयू) अधिक जागा जिंकत भाजप बिहारमध्ये मोठा भाऊ ठरला आहे. या निवडणुकीत भाजपनं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर प्रभारीपदाची जबाबदारी दिली होती. त्यात फडणवीस यशस्वी ठरले. या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर भाष्य केलं.राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे दावे भाजप नेत्यांकडून अनेकदा केले जातात. बिहारमधील विजयानंतर आता महाराष्ट्रातही भाजपचं सरकार येईल, असं ट्विट कालच भाजप आमदार नितेश राणेंनी केलं. मात्र फडणवीस यांनी राज्यातल्या सत्तापरिवर्तनाबद्दल वेगळी भूमिका मांडली. 'आम्ही राज्यातल्या सत्तांतराकडे लक्ष ठेवून काम करत नाही. राज्यातलं सरकार एके दिवशी स्वत:च्याच ओझ्यामुळे कोलमडून पडेल.कारण अशी सरकारं फार काळ चालत नाहीत. ज्या दिवशी हे सरकार कोसळेल, त्या दिवशी आम्ही पर्यायी सरकार देऊ,' असं फडणवीस म्हणाले.बिहारमधील राजकीय परिस्थितीवरही फडणवीस यांनी भाष्य केलं. प्रत्येक निवडणूक वेगळी असते आणि प्रत्येक निवडणूक तुम्हाला काहीतरी शिकवून जात असते. बिहारमधील मतदार अतिशय प्रगल्भ आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला. कोरोना संकट काळात काही सरकारं केवळ टीका करत होती. त्यावेळी मोदींनी विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला, असं फडणवीस यांनी सांगितलं.बिहारमध्ये भाजपला मित्रपक्ष असलेल्या जेडीयूपेक्षा अधिक जागा मिळाल्या असल्यानं मुख्यमंत्रिपद भाजपला मिळावं, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भाजपमधील काही वरिष्ठ नेत्यांनीच याबद्दल विधानं केली आहेत. त्यावर फडणवीस यांनी आम्ही दिलेला शब्द पाळतो, असं म्हणत शिवसेनेला टोला लगावला. नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील, हे पंतप्रधान मोदींपासून अनेक नेत्यांनी सांगितलं आहे. तसा शब्दच आम्ही त्यांना दिलेला आहे. तो शब्द आम्ही पाळणारच, असं फडणवीस म्हणाले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी