मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा भाजपाने राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोग केला. भारतीय जनता पार्टीने अद्यापही त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळू दिली नाही, अशी बोचरी टीका करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केली. याबाबत भारताची जनता भाजपाला माफ करणार नाही. सीबीआय आता चिडीचूप का आहे? याचं उत्तर द्या, असे आव्हानही सावंत यांनी यावेळी दिले.सुशांत सिंह राजपूत याच्या जन्मदिनी सचिन सावंत यांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर सचिन सावंत म्हणाले की, सुशांत सिंह राजपूत हा अत्यंत गुणी व होतकरू कलाकार होता. ज्या पद्धतीने त्याने या जगाचा निरोप घेतला ते अत्यंत दुर्देवाचे होते. परंतु भारतीय जनता पक्षाने मात्र त्याच्या मृत्यूकडे राजकीय संधी म्हणून त्याचा फायदा उचलला. महाराष्ट्राची बदनामी करून बिहार विधानसभा निवडणुकीत मते मिळवण्याकरिता त्याचा उपयोग केला. या प्रकऱणात मुंबई पोलिसांसारख्या अत्यंत कर्तबगार संस्थेची बदनामी गुप्तेश्वर पांडेसारख्या व्यक्तीकडून करवली गेली.
"भाजप सुशांत सिंहच्या आत्म्याला मोक्ष मिळू देत नाही, त्याच्या मृत्यूचा राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोग"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 19:24 IST