शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून भाजप नगरसेवक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 11:08 IST

महापालिकेतील १७ प्रभाग समित्यांपैकी १२ समित्यांवर शिवसेनेला वर्चस्व मिळवता आले आहे. तर पाच प्रभागांच्या अध्यक्षपदावर भाजपला समाधान मानावे लागले. यापैकी एस आणि टी या प्रभाग समित्यांमध्ये भाजपचे १०, शिवसेनेचे ८, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक सदस्य आहेत.

मुंबई :  महापालिकेतील प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी मत फिरवल्याने भाजपचे गणित फिस्कटले. त्यात एस/टी प्रभागात भाजप नगरसेविकेचे मत अवैध ठरवित शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले. मागणी करूनही मतपत्रिकेवरील नगरसेविकेची स्वाक्षरी दाखविण्यात न आल्यामुळे भाजपने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानुसार दोन दिवसांपूर्वीच चिटणीसांच्या घराबाहेर आंदोलन केल्यानंतर सोमवारी भाजप नगरसेवकांनी पालिका मुख्यालयातील महापौर दालन व चिटणीस कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने केली.

महापालिकेतील १७ प्रभाग समित्यांपैकी १२ समित्यांवर शिवसेनेला वर्चस्व मिळवता आले आहे. तर पाच प्रभागांच्या अध्यक्षपदावर भाजपला समाधान मानावे लागले. यापैकी एस आणि टी या प्रभाग समित्यांमध्ये भाजपचे १०, शिवसेनेचे ८, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक सदस्य आहेत. त्यामुळे उभय पक्षांना समान मत असल्याने चिठ्ठीद्वारे अध्यक्षाची निवड होणार होती. मात्र महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपचे एक मत बाद ठरवत शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी घोषित केले.

हा प्रकार संशयास्पद वाटल्याने भाजप नगरसेवकांनी आपल्या नगरसेविकेच्या अवैध झालेल्या मताची पडताळणी करण्यासाठी मतपत्रिका दाखविण्याची मागणी केली. मात्र मतपत्रिका दाखविण्याऐवजी चिटणीस विभागातील कर्मचाऱ्यांनी ती घेऊन सभागृहातून पळ काढला. त्यामुळे आपल्या पक्षाच्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यासाठी महापौरांनी ही खेळी केल्याचा आरोप भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला. या विरोधात भाजप नगरसेवकांनी महापौर दालनाबाहेर सोमवारी तीव्र निदर्शने करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

पालिका चिटणीस यांना हाताशी धरून सत्ताधाऱ्यांनी घाट घातला. आपल्या पक्षाचा उमेदवार विजयी करण्यासाठी महापौरांनी आपले पद पणाला लावले. मुंबई महापालिकेच्या इतिहासातील ही काळी घटना आहे.    - प्रभाकर शिंदे, गटनेते, भाजप

महापौरांवर अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न भाजपने केला होता. मुलाच्या कंपनीला कोविड सेंटरचे कंत्राट, वरळी एसआरए प्रकल्पातील आठ गाळे गिळंकृत केल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आला आहे. मात्र महापौरांनी सर्व आरोपांचे खंडन केले आहे. 

टॅग्स :Mumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाBJPभाजपाMumbaiमुंबई