शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार घोषित; मेधा कुलकर्णींचा पत्ता कट

By प्रविण मरगळे | Updated: November 9, 2020 13:45 IST

Vidhan Parishad Teacher And Graduate Elections: कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना पुणे पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी दिली जाईल असंही बोललं जात होतं मात्र त्यांचा पत्ता कट करून सांगलीतील संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देसांगलीतील संग्राम देशमुख यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारीऔरंगाबाद पदवीधर मतदारसंघात शिरीष बोराळकर यांना उमेदवारी नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी संदीप जोशी तर अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी नितीन धांडेंना उमेदवारी

मुंबई – विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. १ डिसेंबरला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे तर ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून मेधा कुलकर्णी यांचा पुन्हा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या जागी संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपाकडून औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी शिरीष बोराळकर, पुणे पदवीधर मतदारसंघासाठी संग्राम देशमुख, नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी संदीप जोशी तर अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी नितीन धांडे यांच्या उमेदवारीची घोषणा दिल्लीवरून करण्यात आली आहे. 

पुणे पदवीधर मतदारसंघातून गेल्यावेळी भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडून गेले होते. त्यांनी साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील (राष्ट्रवादी) यांचा अवघ्या २ हजार मतांनी पराभव केला होता. चंद्रकांत पाटील गेल्यावर्षी  विधानसभेवर निवडून गेल्याने विधानपरिषदेची जागा रिक्त होती. या पुण्याच्या जागेसाठी महापौर मुरलीधर मोहोळ, रवींद्र भेगडे, अभाविपचे राजेश पांडे हे इच्छुक होते, तर त्याचसोबत कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना ही उमेदवारी दिली जाईल असंही बोललं जात होतं मात्र त्यांचा पत्ता कट करून सांगलीतील संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. गंगाधरराव फडणवीस, नितीन गडकरी अशा दिग्गजांनी येथून दीर्घकाळ प्रतिनिधीत्व केले. सध्याचे आमदार अनिल सोले हे भाजपचे नागपूरचे महापौरही राहिले आहेत. भाजपाने यावेळी संदीप जोशी यांना उमेदवारी दिली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात गेल्यावेळी शिक्षक आघाडी श्रीकांत देशपांडे यांनी शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष अरुण शेळके यांचा पराभव केला होता. शेळके यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा होता.  यावेळी भाजपाने या मतदारसंघात नितीन धांडे यांना उमेदवारी दिली आहे.

विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता?; अद्यापही उमेदवार ठरेना

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात गेल्यावेळी राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी भाजपाचे शिरिष बोराळकर यांचा पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीत भाजपाने पुन्हा एकदा शिरीष बोराळकर यांना संधी दिली आहे. पण यावेळी राष्ट्रवादी-काँग्रेसला शिवसेनेची साथ मिळाली तर भाजपाची वाट खडतर होऊ शकते.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकBJPभाजपाPankaja Mundeपंकजा मुंडे