शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून 'मिशन मुंबई'ची तयारी; मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करणाऱ्या भातखळकरांवर मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 19:29 IST

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आमदार अतुल भातखळकर यांची प्रभारीपदी नियुक्ती

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार अतुल भातखळकर यांची नियुक्ती जाहीर केली. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत  पाटील यांनी मुंबई भाजपा कार्यकारिणी बैठकीत ही नियुक्ती जाहिर केली.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा मी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करेन, असा विश्वास भातखळकर यांनी यावेळी व्यक्त केला. आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच्या सर्व 227 जागा स्वबळावर लढणार असल्याचे भाजपाने जाहीर केले आहे. अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीत पक्षाला घसघशीत विजय मिळवून देण्याचे आव्हान आमच्या समोर असेल. त्यासाठी पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली संघटनेला सज्ज करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करू अशी ग्वाही भातखळकर यांनी दिली. मुंबईकरांना आम्ही भ्रष्टाचार आणि अकार्यक्षम सत्ताधाऱ्यांपासून मुक्ती देऊ आणि पूर्ण बहुमताने भाजपाचा महापौर निवडून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.गेल्या काही दिवसांपासून अतुल भातखळकर ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत आहे. मेट्रो, हिंदुत्व, कथित जमीन घोटाळ्यावरून भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. विशेषत: त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. 

टॅग्स :Mumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाAtul Bhatkalkarअतुल भातखळकरBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटील