शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ खडसे गटाला दे धक्का; सहा नगरसेवक शिवसेनेत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 08:51 IST

Maharashtra Politics: मातोश्री बंगल्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी बुधवारी दुपारी या नगरसेवकांचे शिवबंधन बांधून स्वागत केले. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : मुक्ताईनगरातील एकनाथ खडसे यांच्या गटाला  बुधवारी जोरदार धक्का बसला. त्यांचे समर्थक असलेल्या  मुक्ताईनगर नगरपंचायतीमधील भाजपच्या सहा नगरसेवकांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत  शिवसेनेत प्रवेश केला. आणखी चार नगरसेवक वेटींगवर  असल्याची माहिती मिळाली. मातोश्री बंगल्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी बुधवारी दुपारी या नगरसेवकांचे शिवबंधन बांधून स्वागत केले. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यामुळे जळगाव मनपापाठोपाठ मुक्ताईनगर नगरपंचायतमध्येही शिवसेनेचा भगवा फडकणार आहे.१७ पैकी भाजपचे होते १३ नगरसेवक मुक्ताईनगर ग्रामपंचायतीचे सन २०१८ मध्ये नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाले.  यानंतर झालेल्या निवडणुकीत १७ पैकी १३ नगरसेवक हे भाजपाचे अर्थातच  एकनाथ खडसे गटाचे निवडून आले होते.  एका अपक्ष उमेदवाराने  खडसे गटाला पाठिंबा दिला होता.  त्यामुळे  खडसे गटाकडे १४ नगरसेवक झाले होते.  शिवसेनेचे तीन नगरसेवक निवडून आले होते.  हे नगरसेवक हे भाजपाचे असले तरी खडसे समर्थकच होते.   

यांनी दिली सोडचिठ्टीशिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये भाजपा गटनेते  पियुष महाजन,  उपगटनेते संतोष  कोळी,  माजी सभापती मुकेश वानखेडे,  बिल्किसबी अमानुल्ला खान,  शबाना बी अब्दुल आरिफ , नुसरतबी मेहबूब खान यांचा समावेश आहे. या तीन नगरसेविकांचे पती मुंबईत उपस्थित होते.  

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेPoliticsराजकारण