शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

Bihar Assembly Election Results: बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार?; पंतप्रधान मोदींनी थेट अन् स्पष्टच सांगितलं

By कुणाल गवाणकर | Updated: November 11, 2020 21:20 IST

Bihar Assembly Election Results: बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री व्हावा; भाजप नेत्यांच्या विधानावर मोदींचं भाष्य

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे आभार मानले आहेत. भाजपच्या मुख्यालयात विजयाचा जल्लोष करण्यात आला. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. बिहारच्या जनतेनं जंगलराजला नाकारून विकासाला, सुशासनाच्या बाजूनं कौल दिल्याचं मोदी म्हणाले. कोरोना संकट काळातही मतदार बाहेर पडून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाले. त्याबद्दल मी त्यांचा आभारी असल्याचं मोदींनी म्हटलं. निवडणुकीसाठी मतदान पार पडलं की पूर्वी हिंसाचाराच्या, मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याच्या, मतपेटी पळवून नेल्याच्या बातम्या यायच्या. मात्र आता शांततेत मतदान झाल्याच्या, मतदान वाढल्याच्या बातम्या येतात. ही बाब अतिशय सकारात्मक असल्याचं मोदी म्हणाले. याबद्दल त्यांनी देशवासीयांचे आभार मानले. बिहारच्या जनतेनं विकासाला प्राधान्य देत एनडीएच्या बाजूनं अतिशय स्पष्ट कौल दिल्याचं ते पुढे म्हणाले. कुणामुळे जिंकलं बिहार?; पंतप्रधान मोदींनी मानले 'सायलेंट व्होटर्स'चे खास आभारबिहारमध्ये भाजपला मित्रपक्ष संयुक्त जनता दलापेक्षा (जेडीयू) जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपद भाजपला मिळायला हवं, अशी विधानं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केली. त्यावर मोदींनी थेट आणि स्पष्ट शब्दांत भाष्य केलं. 'आत्मनिर्भर बिहारचा संकल्प आपण केला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली आपण त्यात अजिबात कमी पडणार नाही. भाजप, एनडीएचे कार्यकर्ते पूर्णपणे सरकारच्या पाठिशी उभे राहतील,' असं मोदींनी म्हटलं.भाजपचे सायलेंट व्होटर पक्षाच्या पाठिशीबिहार निवडणुकीत महागठबंधन बाजी मारेल, असे अंदाज जवळपास सगळ्याच एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आले होते. मात्र सर्व अंदाज चुकवत बिहारमध्ये एनडीएनं बाजी मारली. त्यातही भाजपनं जोरदार मुसंडी मारली. त्यामागचं रहस्यदेखील मोदींनी सांगितलं. 'बिहारच्या निवडणुकीनंतर सायलेंट व्होटरची चर्चा सुरू आहे. भाजपकडे एक मोठा वर्ग आहे. हा वर्ग सायलेंट व्होटर आहे. तो वर्ग भाजपला हक्कानं मतदान करतो,' असं मोदी म्हणाले.

महिला मतदार भाजपच्या सायलेंट व्होटर असल्याचं मोदींनी सांगितलं. 'भाजप सरकारमध्ये महिलांना सन्मान मिळाला, सुरक्षा मिळाली. जनधनच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात थेट रोख रक्कम गेली. उज्ज्वला योजनेतून मिळणाऱ्या सिलेंडरमुळे त्याच्या स्वयंपाकघरातला धूर दूर झाला. शौचालयांची बांधणी, वीज पुरवठा, १ रुपयात सॅनिटरी पॅड यामुळे महिलांना मोठा फायदा झाला. याच महिला मतदार भाजपच्या सायलेंट व्होटर आहेत. महिलांचा आशीर्वाद कायम भाजपला मिळतो. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे,' असं मोदी म्हणाले.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेड