शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

Bihar Assembly Election Results: राहुल गांधी 'पुन्हा फ्लॉप'; सभा झालेल्या ५२ पैकी ४२ जागांवर महागठबंधन पिछाडीवर

By कुणाल गवाणकर | Updated: November 10, 2020 17:40 IST

Bihar Assembly Election Results: राहुल यांच्या बिहारमध्ये आठ सभा; ५२ पैकी १० मतदारसंघात दिसला प्रभाव

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल हळूहळू स्पष्ट होऊ लागला आहे. सध्याच्या घडीला एनडीएनं आघाडी घेतली आहे. भारतीय जनता पक्ष ७७, तर संयुक्त जनता दल ४३ जागांवर पुढे आहे. तर राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार ६८ मतदारसंघांत आघाडीवर आहेत. काँग्रेस १८ जागांवर पुढे आहे. त्यामुळे महागठबंधन पिछाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे....म्हणून नितीश कुमारांनी शिवसेनेचे आभार मानावेत; संजय राऊतांनी सांगितलं राजकारणबिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनचं सरकार येईल, असा अंदाज जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी वर्तवला होता. मात्र आता तो चुकीचा ठरताना दिसत आहे. या निवडणुकीत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. त्यांनी जवळपास २५० सभा घेतल्या होत्या. मात्र यादव यांच्या तुलनेत काँग्रेसनं फार जोर लावला नाही. त्यामुळेच महागठबंधनला अपेक्षित जागा मिळाला नसल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. बिहार निवडणुकीत शिवसेनेची तुतारी वाजलीच नाही; सर्व २२ उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मतदानगेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं ४० जागा लढवल्या होत्या. त्यातल्या २७ जागा काँग्रेसनं जिंकल्या. यंदा त्यांनी ७० जागा लढवल्या आहेत. मात्र यातल्या केवळ १९ जागांवर पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा अपयशी ठरले आहेत. राहुल यांनी बिहारमध्ये ८ सभा घेतल्या. त्याचा परिणाम विधानसभेच्या ५२ जागांवर दिसणं अपेक्षित होतं. यातल्या ४२ जागांवर महागठबंधनचे उमेदवार पिछाडीवर आहेत. तर केवळ १० जागांवर महागठबंधनला आघाडी मिळाली आहे. त्यामुळे राहुल गांधी पुन्हा एकदा निष्प्रभ ठरल्याचं दिसत आहे.मोदींच्या 'हनुमाना'चा मित्रपक्षाला फटका; भाजपमुळे जेडीयूला अर्धा डझनचा झटका?बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दिल्लीतून आलेल्या काँग्रेसच्या टीमनं राज्यभर दौरे केले. त्यांनी ५९ सभा घेतल्या. राहुल यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात प्रत्येकी चार अशा आठ सभा घेतल्या. राहुल यांनी दुसऱ्या टप्प्यात हिसुआ, कहलगाव, कुशेश्वरस्थान आणि वाल्मिकीनगरमध्ये जनसभा घेतल्या. तर तिसऱ्या टप्प्यात राहुल यांनी कोढा, किशनगंज, बिहारीगंज आणि अररियामध्ये सभांना संबोधित केलं. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलcongressकाँग्रेसBJPभाजपा