शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

Bihar Assembly Election 2020 : नितीश’राज’समोर ‘तेजस्वी’ आव्हान; कोण मारणार बिहारचं मैदान?

By बाळकृष्ण परब | Updated: November 6, 2020 12:59 IST

Bihar Assembly Election 2020 News : काही दिवसांपूर्वी अगदीच एकतर्फी वाटणारी बिहार विधानसभेची निवडणूक आता कमालीची अटीतटीची बनली आहे. त्यामुळे आता नितीश कुमार आपली सत्ता राखणार की युवा तेजस्वी यादव यावेळी बिहारचं मैदान मारणार याबाबतच्या वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

ठळक मुद्देबिहार विधानसभेची निवडणूक नितीश कुमार यांची जेडीयू आणि भाजपासाठी ही निवडणूक तितकीशी सोपी राहिलेली नाहीनिवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीपासून एनडीएमध्ये सुरू असलेला सावळागोंधळ तसेच निवडणुकोत्तर परिस्थितीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चा यामुळे संभ्रम मोठ्या प्रमाणात वाढला आहेतेजस्वी यादव यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने एनडीएच्या चाणक्यांची समीकरणे गडबडली आहेत

- बाळकृष्ण परब बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सलग १५ वर्षांपासून बिहारमध्ये सत्तेवर असलेल्या नितीशकुमार सरकारविरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी, एकत्र निवडणूक लढवत असूनही भाजपा आणि जेडीयूमध्ये परस्परांबाबत असलेला अविश्वास, एनडीए न सोडता चिराग पासवान यांनी मांडलेली वेगळी चूल आणि लालू यादव यांच्या अनुपस्थितीत आरजेडीच्या नेतृत्वाखालील महाआघाडीची धुरा एकहाती सांभाळणाऱ्या तेजस्वी यादव यांनी प्रचारात घेतलेली जोरदार आघाडी यामुळे काही दिवसांपूर्वी अगदीच एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता कमालीची अटीतटीची बनली आहे. त्यामुळे आता नितीश कुमार आपली सत्ता राखणार की युवा तेजस्वी यादव यावेळी बिहारचं मैदान मारणार याबाबतच्या वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे.बिहार विधानसभा निवडणुकीतील आतापर्यंतच्या घटनाक्रमाचा आढावा घेतल्यास ही निवडणूक नितीश कुमार यांची जेडीयू आणि भाजपासाठी ही निवडणूक तितकीशी सोपी राहिलेली नाही. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीपासून एनडीएमध्ये सुरू असलेला सावळागोंधळ तसेच निवडणुकोत्तर परिस्थितीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चा यामुळे संभ्रम मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात चिराग पासवान यांनी भाजपाला पाठिंबा असल्याचे सांगत थेट नितीश कुमार यांच्याविरोधात मोर्चा उघडल्याने भाजपाची गोची झाली आहे. त्यामुळेच भाजपाच्या बड्या नेत्यांना भाजपा मोठा पक्ष ठरला तरी बिहारमध्ये नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील असं वारंवार सांगावं लागत आहे.

लालूप्रसाद यादव यांच्या अनुपस्थितीमुळे आपला फायदा होईल, असा भाजपा आणि जेडीयूचा असलेला समज फोल ठरताना दिसत आहे. तेजस्वी यादव यांनी महाआघाडीचा मोर्चा सक्षमतेने सांभाळण्यात यश मिळवले आहे. त्यातही त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने एनडीएच्या चाणक्यांची समीकरणे गडबडली आहेत. तसेच एकतर्फी होणारी निवडणूक अटीतटीच्या लढाईपर्यंत आली आहे. मात्र असं असलं तरी नितीश कुमार आणि भाजपाच्या यांच्या हातून बाजी निसटली आहे असं म्हणणं घाईचं ठरेल. त्याचं कारण बिहारमधील राजकीय आणि जातीय समीकरणांमध्ये दडलेलं आहे.महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळून अनेक वर्षे लोटली आहेत. बिहारमध्येही गेल्या का वर्षांपासून आघाड्यांचे राजकारण सुरू आहे. त्यातही हे राजकारण लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल, नितीश कुमार यांचा जेडीयू आणि भाजपा या तीन पक्षांभोवती केंद्रित आहे. या तीनपैकी जे दोन पक्ष एकत्र येतात त्यांचा सत्तेचा मार्ग सोपा होतो. २०१५ मध्ये लालूंचा राजद आणि नितीश कुमारांचा जेडीयू एकत्र आल्याने भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागले होते. आता जेडीयू आणि भाजपा एकत्र आहेत. तर राजद आणि काँग्रेसची महाआघाडी मैदानात आहे.यातील महत्त्वाची बाब म्हणजे राजद, जेडीयू आणि भाजपा या तिन्ही पक्षांचा स्वत:चा असा जनाधार आहे. काही झाले तरी हा मतदार या पक्षांपासून दुरावत नाही. त्यामुळेच भाजपाला २०१५ मध्ये प्रबळ महाआघाडीविरोधात लढूनही ५३ जागा मिळाल्या होत्या. तर नितीश कुमार यांची एकछत्री राजवट असतानाही लालूंच्या आरजेडीला आपला प्रभाव टिकवता आलाय. त्यामुळे या तीनपैकी दोन पक्ष एकत्र आल्यावर विजय पक्का, असं समीकरण आहे. म्हणूनच २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा, नितीश आणि पासवान यांचे पक्ष एकत्र आल्यावर त्यासमोर लालूंच्या महाआघाडीची दाणादाण उडाली होती. मात्र आता या समीकरणांमध्ये काहीसा बदल झालाय. पासवान यांना लोकजनशक्ती पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवतोय. त्यामुळे एनडीएचे बळ किंचीत घटले आहे. दुसरीकडे तेजस्वी यादव यांनी प्रचाराचा जोरदार धडाका लावला असला तरी त्यांचा सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसचे बिहारमधील अस्तित्व यथातथा आहे. त्यामुळे ही निवडणूक आरजेडीला एकहाती लढावी लागत आहे.त्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन निवडणुकांमधील मतदानाचे गुणोत्तर आणि सध्याचा मतदारांचा कल विचारात घेतला तर ही निवडणूक अटीतटीची होत असली तरी त्यात नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचा पराभव होईल, असं वाटत नाही. आता एनडीएला २०१९ ची लोकसभा आणि २०१० च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे एकतर्फी यश मिळेल, असं वाटत नाही. मात्र नितीश कुमार आणि एनडीएला प्रतिष्ठा राखण्याइतपत जागा मिळतील, अशी शक्यता आहे. दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्यासाठी सत्ता अद्याप दूर दिसत असली तरी त्यांनी एनडीएची झोप उडवली आहे एवढं नक्की. आता त्यांचा पक्ष सत्तास्थानापर्यंत जाईल की नाही याची चर्चा अजून काही दिवस चालेल. पण बिहारमध्ये आपलं नेतृत्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने त्यांनी एक पाऊल टाकलंय एवढं मात्र नक्की.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादव