शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Assembly Election 2020 :बेरोजगारीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी मूग गिळून गप्प - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 05:05 IST

Bihar Assembly Election 2020 News : बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांनी प्रचारमोहिमेच्या दुसऱ्या फेरीत पश्चिम चंपारण जिल्ह्यातील वाल्मीकीनगर येथे बुधवारी जाहीर सभा घेतली.

वाल्मीकीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर देशांतील समस्यांबद्दल बोलताना दिसतात; पण भारतामधील बेरोजगारी व अन्य समस्यांबद्दल ते आपल्या भाषणांतून अवाक्षरही काढत नाहीत, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांनी प्रचारमोहिमेच्या दुसऱ्या फेरीत पश्चिम चंपारण जिल्ह्यातील वाल्मीकीनगर येथे बुधवारी जाहीर सभा घेतली. ते म्हणाले की, दसऱ्याच्या दिवशी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. ते पाहून मनाला वेदना झाल्या. मोदींविषयी युवक व शेतकऱ्यांच्या मनात किती संताप आहे याचेच दर्शन प्रतिमा दहनाच्या निमित्ताने घडले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासमवेत घेतलेल्या प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदी आपल्या भाषणांमध्ये इतर देशांतील समस्यांचा उल्लेख करतात; पण भारतातील समस्यांबद्दल ते काहीच बोलत नाहीत. ही गोष्ट बिहार, पंजाब, उत्तर प्रदेशमधील युवक, शेतकऱ्यांना खटकते आहे. राहुल गांधी म्हणाले की, आपण दोन कोटी नोकऱ्या देणार, असे आता मोदी भाषणांतून सांगत नाहीत. समजा तसे त्यांनी आता सांगितले तर सभेला आलेले श्रोतेच त्यांना रोखतील. तुम्ही नोकऱ्या देण्याबाबत खोटे बोलला आहात, असे लोकच मोदींना सांगतील. देशाचा कारभार कसा करायचा याची काँग्रेसला उत्तम जाण आहे. शेतकरी, युवकांना कशी साथ द्यायची हे आमच्या पक्षाला माहीत आहे. मात्र, खोटे बोलण्याची सवय काँग्रेसला नाही. (वृत्तसंस्था)  

हा तर पायलट प्रोजेक्टराहुल गांधी म्हणाले की, २००६ साली बिहारमध्ये बाजार समित्या रद्द करण्यात आल्या. एक प्रकारे हा निर्णय तीन नवे कृषी कायदे संमत करण्याआधीचा पायलट प्रोजेक्ट असावा. जे नितीशकुमारांनी बिहारमध्ये २००६ साली केले तेच नरेंद्र मोदी आता पंजाबमध्ये करू पाहत आहेत.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी